रमेश पाटील

आज बुधवारी संध्याकाळी झालेल्या वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाने संपूर्ण भातशेतीच भुईसपाट केली आहे. ढगफुटी प्रमाणेच दोन तास कोसळलेल्या वादळी पावसाने संपुर्ण भात पीक उद्ध्वस्त केलं आहे.
निम्म्याहून जास्त भात पीकं कापणीसाठी तयार झाली आहेत. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून वाडा, विक्रमगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात कापणीची कामे सुरु आहेत. वाडा, विक्रमगड या दोन्ही तालुक्यात जवळपास पाचशे हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावरील भात पीकाची कापणी करुन शेतामध्येच सुकविण्यासाठी पसरुन ठेवले होते. हे संपूर्ण भातपीक आज जोरदार कोसळलेल्या वादळी पावसाने उद्ध्वस्त केले आहे.
ज्या शेतकऱ्यांची उभी असलेली पिके जमीनदोस्त केली आहेत. शेतांमध्ये फूटभर पाणी भरल्याने ही पिकं कुजून जाणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.