News Flash

माजी महापौर शाहू सावंत यांचे निधन

कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर शाहू सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर शाहू सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६० वर्षांंचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

निष्ठावान शिवसैनिक म्हणून ते ओळखले जात. डोंबिवली परिसरात शिवसेना स्थापन व वाढविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. शाहू सावंत पहिल्या लोकप्रतिनिधी राजवटीत नगरसेवक होते. १९९९ मध्ये ते महापौर झाले. राणे समर्थक म्हणून ते ओळखले जात होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, नवी मुंबईचे माजी महापौर चंदू राणे, महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त ई. रवींद्रन, अतिरिक्त आयुक्त संजय घरत, सर्वपक्षीय नगरसेवक, पदाधिकारी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 12:36 am

Web Title: former thane mayor shahu sawant passes away
Next Stories
1 मुंब्रा, दिव्यात महावितरणचे छापे
2 महापौर चषक चित्रकला स्पर्धा
3 आदर्श विद्यार्थी अद्भुत भारत घडवतील – व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण
Just Now!
X