News Flash

घरात सूनेवर वाईट नजर ठेवणाऱ्या सासऱ्याला विरार पोलिसांनी ठोकल्या बेडया

आपल्या सूनेवरच वाईट नजर ठेवणाऱ्या ५० वर्षीय सासऱ्याला विरार पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत.

आपल्या सूनेवरच वाईट नजर ठेवणाऱ्या ५० वर्षीय सासऱ्याला विरार पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महिलेने नवऱ्याकडे त्याच्या वडिलांचे इरादे चांगले नसल्याची तक्रार केली होती. जेव्हा नवऱ्याने तिच्यावर विश्वास ठेवायला नकार दिला. तेव्हा तिने आरोपीच्या कृती कॅमेऱ्यात कैद करण्याचा निर्णय घेतला. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

आरोपी पेशाने रिक्षाचालक आहे. आरोपी सासरा नेहमी स्वयंपाकघरात आपल्या सूनेचा विनयभंग करायचा. सासऱ्याच्या वर्तनाचे चित्रीकरण करण्यासाठी तिने स्वयंपाकघरात योग्य ठिकाणी मोबाइल फोनचा कॅमेरा सुरु करुन ठेवला. संध्याकाळी महिला स्वयंपाकघरात असताना सासरा तिथे आला व त्याने नको त्या ठिकाणी स्पर्श केला. त्याचे हे वर्तन कॅमेऱ्यात कैद झाले होते.

नवरा घरी आल्यानंतर तिने त्याला ती क्लिप दाखवली. मुलाने याबद्दल जेव्हा त्याच्या वडिलांना जाब विचारला तेव्हा त्यांनी मुलाला आणि सुनेला घर सोडून जाण्यास सांगितले अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. महिलेने त्यानंतर विरार पोलीस स्थानकात जाऊन सासऱ्याविरोधात एफआयआर नोंदवला. आम्ही आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2019 6:03 pm

Web Title: man held for molesting his daughter in law virar dmp 82
Next Stories
1 डोंबिवली : सोसायटीत ‘पब्जी’ खेळायला विरोध, शेजाऱ्यांकडून महिलेला जबर मारहाण
2 ठाणे : कळव्यात घरांवर दरड कोसळून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू
3 पूर ओसरला, हाल कायम!
Just Now!
X