20 September 2020

News Flash

ठाण्यात दोन पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

रश्मी करंदीकरांकडे मुख्यालय-१ची जबाबदारी

रश्मी करंदीकरांकडे मुख्यालय-१ची जबाबदारी

ठाणे पोलीस आयुक्तालयातील दोन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची गुरुवारी बदली करण्यात आली असून त्यात वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांचा समावेश आहे. करंदीकर यांच्याकडे मुख्यालय-१ची तर पालवे यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अलीकडेच ठाण्यात बदली झालेले पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांच्याकडे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.

रश्मी करंदीकर यांचा वाहतूक शाखा विभागातील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आला असून त्या पाश्र्वभूमीवर त्यांची बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याकडे आता आयुक्तालयातील मुख्यालय-१ उपायुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचा कारभार सांभाळणारे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली असून त्यांनी गुरुवारी वाहतूक शाखेचा कार्यभार हाती घेतला. तसेच पालवे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपायुक्तपदी पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 12:47 am

Web Title: police commissioner transfers in thane
Next Stories
1 गॅलऱ्यांचा फेरा : दुष्काळग्रस्तांसाठी ‘जहांगीर’मध्ये..
2 शिळफाटा शरपंजरी
3 विमानतळांच्या ‘मेट्रो’ जोडणीची खलबते!
Just Now!
X