News Flash

लाच घेताना दोघांना अटक 

राजकुमार भारती, रामप्रकाश तिवारी अशी अटक केलेल्या खासगी व्यक्तींची नावे आहेत.

कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यातील साहेबांना सांगून अटकेत असलेल्या आरोपीला सोडविण्यासाठी सांगतो, असे सांगून तक्रारदाराकडून ५० हजारांची लाच घेणाऱ्या दोन खासगी व्यक्तींनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्यामुळे हे दोघे तपासादरम्यान कोणत्या साहेबाचे नाव घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राजकुमार भारती, रामप्रकाश तिवारी अशी अटक केलेल्या खासगी व्यक्तींची नावे आहेत. तक्रारदाराचा भाऊ महात्मा फुले पोलीस ठाण्यात एका गुन्ह्य़ात अटक आहे. या गुन्ह्य़ातून भावाची सुटका करण्याची हमी राजकुमार व रामप्रकाश यांनी घेतली. आपण महात्मा फुले पोलीस ठाण्यातील साहेबांना सांगून आरोपीला सोडविण्यास सांगतो, असे या दोघांनी तक्रारदाराला सांगितले. याप्रकरणी तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार या विभागाच्या पथकाने दोन लाखांपैकी पन्नास हजार रुपये स्विकारताना दोघांना अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 1:20 am

Web Title: two person arrested in bribe case in kalyan
टॅग : Bribe Case,Kalyan
Next Stories
1 अन् ३५ प्रवाशांचा सुटकेचा नि:श्वास!
2 डोंबिवली स्फोटातील मृतांची संख्या दहावर, मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
3 रासायनिक विभाग सुरक्षित ठिकाणी हलविणार
Just Now!
X