उन्हाळ्यात थंडावा मिळावा यासाठी प्रत्येकजण आइस्क्रीम पार्लर किंवा ज्यूस सेंटरचा आधार घेताना दिसत आहे. उन्हाची काहिली वाढत असताना सद्य:स्थितीत तापमानातील आद्र्रतादेखील वाढली आहे. अशा वातावरणात एखाद्याची पावले नजीकच्या आइस्क्रीम पार्लरकडे वळली नाहीत तर नवलच. वेगवेगळ्या प्रकारे तृष्णा भागवताना चवदार मलाई कुल्फी किंवा काजू अंजीर आइस्क्रीमवर खवय्ये अगदी चवीने ताव मारताना दिसतात. ठाणे येथील तलावपाळी परिसरात अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या विजय आइस्क्रीम या दुकानात विविध आइस्क्रीम फ्लेवरचा खजाना दिसून येतो. येथे आलेला प्रत्येकजण आइस्क्रीमच्या थंडाव्याचा आणि चवीचाही मनसोक्त आस्वाद घेताना नजरेस पडतो. उन्हाळ्यात आइस्क्रीम पार्टी करणे तर आबालवृद्धांसाठी आवडता कार्यक्रम ठरतो. सुट्टीच्या काळात घरात सर्व एकत्र जमले की आइस्क्रीम पार्टी होतेच. अशांसाठी तलावपाळी येथील विजय आइस्क्रीमचे दुकान वेगवेगळ्या फ्लेवरची पर्वणी घेऊन सज्ज आहे.

उन्हाळा वाढल्याने तलावपाळी येथे फिरायला आलेल्या अनेकजणांची पावले विजय आइस्क्रीमकडे हमखास वळतात. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या हे आइस्क्रीमचे दुकान रात्री १२ वाजेपर्यंत हमखास सुरू असते. या दुकानातील ‘रोस्टेड अल्मंड’ या आइस्क्रीमला मोठी  मागणी असून दिवसाला २०-३० किलो आइस्क्रीम सहज संपते. या आइस्क्रीममध्ये चॉकलेट, भाजलेले बदाम आदी जिन्नस टाकलेले असतात. मुळातच विजय आइस्क्रीम यांचा आइस्क्रीम बनविण्याचा कळवा येथे स्वत:चा कारखाना आहे. हे आइस्क्रीम बनविण्यासाठी दिवसाला ५०० ते ७०० लिटर दूध लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. याचबरोबर सीताफळ, लीची या आइस्क्रीमनाही तितकीच मागणी आहे. मात्र हे आइस्क्रीम फक्त त्या फळांचा मोसम असेल तेव्हाच मिळते. थंडीमध्येही आइस्क्रीम खाणारे काही कमी नसतात, असे विजय आइस्क्रीम दुकानाचे मालक विजय गुप्ता यांनी सांगितले. या काळात सीताफळ, लीची फ्लेवरला मोठी मागणी असते असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर केसर पिस्ता हे सर्रास सगळीकडे मिळणारे आइस्क्रीम आहे. येथील आइस्क्रीममध्ये केसरचे प्रमाण अधिक असते असे दुकानातील व्यवस्थापकांचे मत आहे. केसर फ्लेवर आइस्क्रीमला एक वेगळ्या प्रकारची चव असते. येथील केसरची चव काही काळ जिभेवर रेंगाळत राहते. आइस्क्रीम बनविताना दर्जेदार केसर वापरत असून ते खास काश्मीर येथून मागवले जात असल्याचे विजय गुप्ता यांनी नमूद केले. कॅन्डी आइस्क्रीम, स्लाइस आइस्क्रीम आणि कोन आइस्क्रीम आदी तीन प्रकारच्या पद्धतीने येथे आइस्क्रीम खायला मिळते. ३०० ते ३५० कोन आइस्क्रीम दिवसभरात अगदी सहज संपतात. कॅन्डी आइस्क्रीममध्ये चॉकलेट विथ व्हेनिला चोकोबार मिळतो. तर स्पेशल चोकोबारमध्ये व्हेनिला वीथ ड्रायफ्रुट चोकोबार अगदी सहज मिळतो. त्यामुळे ज्यांना ड्रायफ्रुट्स खायला आवडत नाही अशांना आइस्क्रीम खाल्ल्याने पौष्टिक पदार्थ खाल्ल्याचे समाधान मिळते. मलई, पीस्ता, मँगो, केशर आदी प्रकोरचे आइस्क्रीम खायला मिळते. ‘स्पेशल रोज’ या आइस्क्रीममध्येही गुलकंद आणि रोज सरबताचा वापर केला जातो. हे आइस्क्रीम गुलकंद असल्यामुळे पोटालाही थंडावा देण्याचे काम करते. या दुकानाला ३८ वर्षे झाल्याचेही विजय यांना सांगितले.

Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
Heat wave again in Vidarbha Akola recorded the highest temperature on Friday
विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट? जाणून घ्या, अकोल्यात पारा कुठे पोहचला
bullock cart youth death marathi news
सांगली: शर्यतीवेळी बैलगाड्याच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू
akola unseasonal rain marathi news
अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा तडाखा; चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; ५५ घरांची पडझड

काजू अंजीर आइस्क्रीमही अतिशय चवदार असते. सगळ्याच आइस्क्रीमना मागणी असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. शिवाय आम्लपित्त झाले असल्यास या आइस्क्रीमचा अतिशय फायदा होतो. आजकल मधुमेहाचे रुग्ण अधिक आढळतात. यापैकी अनेकांना आइस्क्रीम खाण्याचा मोह आवरता येत नाही. अशा रुग्णांसाठी शुगर फ्री आइस्क्रीमही येथे मिळते. इतर आइस्क्रीमच्या तुलनेत या आइस्क्रीममध्ये साखर कमी असते. शिवाय वापरण्यात येणारी सामग्री थोडी महाग असल्याने हे आइस्क्रीमही ४५ रुपयांना मिळते. इतर आइस्क्रीमच्या तुलनेत हे आइस्क्रीम थोडे महाग असते. हे दुकान एकही दिवस बंद नसते. तसेच १२ रुपयांपासून ते ३६ रुपयांपर्यंत हे आइस्क्रीम खवय्यांना खाता येते. या आइस्क्रीमच्या गुणवत्तेच्या आधारे यांची किंमत ठरवलेली आहे. काही आइस्क्रीमची किंमत २८ रुपये इतकी आहे. या आइस्क्रीममध्ये फळांचा तसेच ड्रायफ्रुटचा वापर तुलनेने कमी केलेला असतो. तर चांगल्या दर्जाच्या आइस्क्रीममध्ये ड्रायफ्रुटचा वापर अधिक असतो. मात्र दुधाच्या गुणवत्तेत अजिबात फरक करत नसल्याचेही विजय गुप्ता यांनी सांगितले. स्लाइस आइस्क्रीम खावयाचे झाल्यास ५० ग्रॅमपासून हे आइस्क्रीम विकत घेता येते. त्यामुळे या दुकानातील थंडगार आइस्क्रीम खाण्याचा खवय्यांचा अनुभव आगळावेगळा आहे.