News Flash

रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग

पोलिसांनी तात्काळ या आरोपी रिक्षाचालकला अटक केली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाण्यातील रिक्षाचालकाकडून महिलेच्या विनयभंगाचा प्रकार ताजा असतानाच आता उल्हासनगर शहरातही एका रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तात्काळ या आरोपी रिक्षाचालकला अटक केली आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ३ येथे राहणारी ३१ वर्षीय महिला आपल्या बहिणीला भेटण्यासाठी अमन टॉकीज परिसरातील सारस्वत बँकेसमोरून रस्ता ओलांडून जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी शेजारून जाणाऱ्या चंद्रकांत कटारे (३९) या रिक्षाचालकाने महिलेला पाहून रिक्षा थांबवली. त्याचवेळी त्याने रिक्षातून उतरून त्या महिलेची ओढणी ओढून तसेच विकृत हावभाव विनयभंग केला. महिलेने विरोध करताच रिक्षाचालक चंद्रकांत कटारे याने रिक्षा सुरू करत घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कल्याण येथील अशोकनगर, वालधुनी येथे राहणाऱ्या चंद्रकांत कटारे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी आरोपी चंद्रकांत कटारे याला अटक केली. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक एम. जी. गायकर करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 1:25 am

Web Title: woman rape in thane
Next Stories
1 ठाण्याच्या मनोरुग्णालयात ‘रक्षाबंधन’ साजरा
2 ठाण्यात ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या बाईक रॅलीचे आयोजन
3 रन फॉर… ‘चले जाओ’ : ठाण्यात क्रांती दौडचे आयोजन
Just Now!
X