महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारुन भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रभाव असणाऱ्या ठाण्यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारत भाजपाच्या सोबतीने सरकार स्थापन केलेल्या आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांची काल शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यातील नगरसेवकांनी भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. ठाण्यातील एकूण ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली आहे. मात्र या बातमीनंतर शिंदेंच्या विरोध असणारा तो एकमेव नगरसेवक कोण यासंदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत.

नक्की पाहा >> Photos: “घराची पायरी चढताच माझी…” CM होऊन घरी परतल्यानंतर शिंदेंची भावनिक पोस्ट; म्हणाले, “त्याने मला पाहिल्यावर…”

ठाण्यातील ६४ शिवसेना नगरसेवकांनी काल (बुधवार, ६ जून २०२२) रात्री उशिरा नंदनवन या शिंदे यांच्या मुंबईतील बंगल्यावर त्यांची भेट घेतली. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे सद्य स्थितीत ६७ नगरसेवक आहेत. टेंभी नाक्याचे शिवसेना नगरसेवक सुधीर कोकाटे हे अमरनाथ यात्रेसाठी गेल्याने ते नव्हते, तर घोडबंदर येथील पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांची बायपास शस्त्रक्रिया झाल्याने तेही यावेळी उपस्थित नव्हते. उर्वरित ६४ नगरसेवक यावेळी हजर होते. तर एक नगरसेवक या सर्व नगरसेवकांसोबत नव्हता. शिंदेसोबत न जाण्याचा निर्णय घेणारी ठाण्यातील एकमेव नगरसेवक ही महिला असून त्यामागे एक खास कारण आहे.

नक्की वाचा >> “आदित्य ठाकरेंना सुरतला पाठवतो असं मुख्यमंत्री म्हणाले, त्यावेळी…”; संजय राऊतांसंदर्भात आमदाराचा खळबळजनक दावा

बुधवारी शिंदेंना समर्थन देणाऱ्या नगरसेवकांमध्ये केवळ एक नगरसेविका स्वच्छेने आल्या नव्हत्या त्यांचं नाव आहे नंदिनी विचारे. उद्धव ठाकरेंच्या गटाला समर्थन करणाऱ्या खासदार राजन विचारे यांच्या त्या पत्नी आहे. कालच्या या भेटीदरम्यान नंदिनी विचारे अनुपस्थितीत होत्या. नंदिनी विचारे यांचा अपवाद वगळता उर्वरित ६६ नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत, अशी माहिती नरेश म्हस्के यांनी दिली.

नक्की वाचा >> डोंबिवलीतील वाहनांमधून बंडखोर आमदार सुरतेत, गुजरातच्या हद्दीत पोहोचताच…; BJP कनेक्शनची गोष्ट

कालच विचारेंवर सोपवण्यात आली मोठी जबाबदारी
कालच शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचे खासदार राजन विचारे यांना लोकसभेत शिवसेनेचे नवे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्त करण्यात आलंय. यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्याऐवजी विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोद बदलाची माहिती राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र पाठवून दिली.

नक्की वाचा >> १३ हजार ३४० कोटींचा ‘तो’ निधी रोखला; अजित पवारांना शिंदे सरकारचा दणका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलै रोजी सुरू होत असून त्याच दिवशी राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. आमदारांनंतर खासदारांकडूनही संभाव्य बंडाची शक्यता व्यक्त केली जात असल्याने शिवसेनेने लोकसभेतील मुख्य प्रतोद बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. लोकसभेत शिवसेनेचे १८ खासदार असून राज्यसभेत तीन खासदार आहेत.