खुल्या चित्रकला स्पर्धेमध्ये ८०० विद्यार्थ्यांचा सहभाग

या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्ले ग्रुपमधील विद्यार्थ्यांना विशेष सन्मानित करण्यात आले.

खुल्या चित्रकला स्पर्धेमध्ये ८०० विद्यार्थी सहभागी झाल्याने एकप्रकारचा विक्रम झाला आहे.

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डोंबिवली, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटी आणि श्री लक्ष्मीनारायण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी टिळक शाळेच्या पटांगणात खुल्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्ले ग्रुपमधील विद्यार्थ्यांना विशेष सन्मानित करण्यात आले. विद्या निकेतन शाळेचे जास्त विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाल्याने शाळेला विशेष स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत ८०० विद्यार्थी सहभागी झाले होते. पहिली आणि दुसरीच्या गटात विद्या निकेतन शाळेच्या आभा उंटावले हिने प्रथम क्रमांक पटकवला. तिसरी आणि चौथीच्या गटात विद्या निकेतन शाळेच्या विद्या बनाये, पाचवी ते सातवीच्या गटात हॉली एंजल्स शाळेच्या अरुण सारंग, आठवी ते दहावीच्या गटात चंद्रकांत पाटकर शाळेच्या अनिश जाधव यांनी बाजी मारली. तर खुल्या गट स्पर्धेत जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या सूरज बिटे हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेचे परीक्षण विनह शाह, अलका पाठारे, चारुता कुं टे, लीना चौधरी यांनी केले.
या वेळी टिळक नगर सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष नंदन दातार, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सिटीचे अध्यक्ष अभिजित पंडित आणि लक्ष्मीनारायण स्पर्धेचे अभय जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 800 students participated in open painting competition