लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघात ३ जानेवारी २४ ते ३ मे २०४ या कालावधीत करण्यात आलेल्या नव मतदार नोंदणी मोहिमेत एकूण ८३ हजार ८०७ मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवली. हे नव मतदार प्रथमच कल्याण लोकसभा आणि पुढील होणाऱ्या निवडणुकांसाठी यापुढे मतदान करतील, अशी माहिती कल्याण लोकसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी गुरूवारी सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील निवडणूक कार्यालयात दिली.

Thane district has the highest number of graduate voters
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक पदवीधर मतदार, ठाण्यापाठोपाठ रायगडमध्ये मतदारांची संख्या जास्त
rajya sabha members resign Post LS elections
लोकसभेवर निवडून आलेल्या राज्यसभा सदस्यांना आणि आमदारांना राजीनामा द्यावा लागतो का? दोन लोकसभा जागांबाबत तरतूद काय?
Vidarbha, Assembly,
विदर्भात लोकसभेचा विधानसभानिहाय कौल कोणाच्या फायद्याचा ?
Mahavikas Aghadi, Uran ,
उरणमधून महाविकास आघाडीला मताधिक्य, निकालातून विधानसभेची नांदी
Chandrapur, Congress,
चंद्रपूर : लोकसभेच्या सहाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला प्रचंड मताधिक्य
Rohit pawar mahayuti
“इथे मस्ती उतरवून मिळेल”, मविआच्या लोकसभेतील यशानंतर रोहित पवारांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
narayan rane vs vinayak raut ratnagiri
कोकणात पुन्हा नारायण राणेंचाच बोलबाला, विनायक राऊतांचा केला दणदणीत पराभव
Assembly elections likely to be held in October
दिवाळीपूर्वी प्रचाराचे फटाके; विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये

३ जानेवारीपर्यंत कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतदार संख्या १९ लाख ९८ हजार ४२४ होती. जानेवारी ते ३ मे या कालावधीत निवडणूक आयोगाकडून नव मतदार नोंदणी मोहीम विविध स्तरावर राबविण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघात ८३ हजार ८०७ नव मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली. त्यामुळे आता कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या २० लाख ८२ हजार २३१ आहे, असे सातपुते यांनी सांगितले.

आणखी वाचा-बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

मतदान केंद्रे

कल्याण लोकसभा हद्दीतील सहा विधानसभा मतदारसंघात एक हजार ९६० मतदान केंद्रे आहेत. यावेळी या मतदार संघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही. एकाच भागात १० पेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या एक हजार १२ ठिकाणी वेब कास्टिंग आणि तेथे सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. या केंद्रातील मतदान प्रक्रियेचे (मतदान कक्ष वगळून) काम निवडणूक नियंत्रण अधिकारी कक्षात बसून पाहू शकणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर अपंगांसाठी रॅम्प, व्हिलचेअर सज्ज ठेवली जाणार आहे. याशिवाय स्वच्छतागृह, पाणी, औषधांचा संच तयार ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणी साहाय्यक म्हणून आशा सेविका, आरोग्य सेविकांची नेमणूक केली जाणार आहे.

अपंगांना घर ते मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सुविधा करण्यात आली आहे. अंध मतदारांना ब्रेल लिपीतील मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. काही मतदार व्याधीग्रस्त असतात, हा विचार करून मतदारांना कोणताही त्रास नको म्हणून बहुतांशी मतदान केंद्रे इमारतीच्या तळ मजल्याला प्रस्तावित केली आहेत, अशी माहिती सातपुते यांनी दिली.

आणखी वाचा-आमच्याबरोबर या, हिंदुत्व पुढे नेऊ! उद्धव ठाकरे यांची भाजप, संघ कार्यकर्त्यांना साद 

कर्मचारी सज्ज

कल्याण लोकसभा मतदारसंघात पोलीस, गृहरक्षक दलासह एकूण १० हजार कर्मचारी निवडणूक कामासाठी योग्य त्या प्रशिक्षणासह सज्ज करण्यात आले आहेत. सहा विधानसभा मतदारसंघांतील काही ठिकाणी एक मतदान केंद्र महिला, एक केंद्र युवा आणि एक केंद्र अपंग व्यक्तिंच्या माध्यमातून चालविले जाणार आहे. या निवडणुकीतील हे वैशिष्टय आहे, असे सातपुते यांनी सांगितले. कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील दिवंगत सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात होणार आहे.

नाट्यगृह बंद

सावळाराम महाराज क्रीडासंकुलाजवळ सावित्रीबाई फुले नाट्यगृह आहे. नाट्यगृहाच्या भुयारात मतपेट्या ठेवण्याची सुरक्षित व्यवस्था असल्याने कल्याण लोकसभेतील मतपेट्या याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. या मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था येथे आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सावित्रीबाई फुले नाट्यगृह परिसर करण्यात आला आहे. त्यामुळे ४ जूनपर्यंत सावित्रीबाई नाट्यगृहातील सर्व नाट्यप्रयोग, इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.