डोंबिवली – कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील काटई गावात एका दारुड्या पतीने पत्नी दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून पत्नीला शनिवारी बेदम मारहाण केली. या मारहाणीत विवाहितेच्या कुटुंबीयांनी सहभाग घेऊन तिला ठोशाबुक्क्यांनी मारहाण केली.

जखमी विवाहिता प्रतीक्षा सागर चौधरी (२४, रा. विठ्ठल मंदिरा शेजारी, काटई गाव, डोंबिवली) हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती सागर चौधरी, रमेश नाना चौधरी, जिजाबाई रमेश चौधरी, शरद रमेश चौधरी, रेणुका शरद चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक्षाचा पती सागर याला बैलगाडा शर्यत आणि दारूचे व्यसन आहे. मिळणारा पगार तो बैलगाडा शर्यत आणि दारूवर उडवतो.

हेही वाचा – ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला; खोलीत अडकलेल्या पाचजणांची पालिकेच्या पथकाने केली सुटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सागर चौधरी शनिवारी संध्याकाळी दारू पिऊन घरी आला. तो पत्नी प्रतीक्षाकडे दारूसाठी पैसे मागू लागला. पत्नीने त्यास नकार देताच त्याने तिला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून बेशुद्ध केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. प्रतीक्षाला संरक्षण देण्याऐवजी तिच्या सासरच्या मंडळींनीही तिला बेदम मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. प्रतीक्षाचे वडील मोटारीने काटई येथे पोहोचले. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी के. एस. सूर्यवंशी या प्रकरणाचा तपास करत आहेत.