लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: मुंब्रा येथील अमृतनगर भागात गुरुवारी मेफेड्राॅन (एमडी) हे अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या शाबीर शहा मोहम्मद खान (३९) याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून २७ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली.

अमृतनगर येथे एकजण अमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी शाबीर खान हा एका कारमधून जात होता. पोलिसांनी शाबीरची कार अडवून त्याची झडती घेतली. त्याच्याकडे २७ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली.

हेही वाचा… ठाणे: आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून व्यापाऱ्याची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.