मागील काही दिवसांपासून विविध कारणांमुळे ठाण्यात वाहतूक कोंडीचा जाच वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. शुक्रवारी सकाळीही ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई महापालिकेच्या वाहनाची डिझेलची टाकी फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडले होते. परिणामी कॅडबरी जंक्शन ते माजीवडापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, आता कोंडी सुटली असून वाहतूक पूर्ववत झाली आहे.

हेही वाचा- शिळफाटा मार्गावरील वाहतूक रात्री बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्व द्रुतगती महामार्गावरून शुक्रवारी सकाळी सुमारे ८.३० वाजता मुंबई महापालिकेचे ‘वाहन बिघाड दुरूस्ती’चे वाहन मुंबईच्या दिशेने वाहतूक करत होते. हे वाहन कॅडबरी जंक्शन येथील उड्डाणपूलावर आले असता वाहनातील डिझेलची टाकी फुटली आणि सर्व डिझेल रस्त्यावर सांडले. या घटनेमुळे कॅडबरी जंक्शन ते माजीवडापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. उड्डाणपूलावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि वाहतूक पोलीस दाखल झाले असून वाहतूक कोंडी सोडवण्यात आली आहे.