जुन्या ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात तब्बल ४.५ फूट लांब विषारी घोणस जातीचा साप रविवारी पहाटे आढळून आल्याने खळबळ उडाली. सुदैवाने या सापाला पोलीस ठाण्यातील आवारात पकडणे शक्य झाले. हा साप पोलीस ठाण्यातील अडचणीच्या ठिकाणी किंवा कोठडीत शिरला असता तर पोलीस आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. यापूर्वीही नौपाडा पोलीस ठाण्यात साप पकडण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नौपाडा पोलीस ठाणे हे ठाणे शहर पोलीस दलातील मुख्य पोलीस ठाणे आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठाणे स्थानक परिसराचा काही भाग, नौपाडा, पाचपाखाडी, हरिनिवास चौक हा महत्त्वाचा परिसर येतो. त्यामुळे दररोज या पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी किंवा कामानिमित्ताने येणाऱ्या नागरिकांची वर्दळ सुरू असते. रविवारी पहाटे या पोलीस ठाण्यात पाच ते सह कर्मचारी उपस्थित होते. त्याचवेळी पोलीस ठाण्याच्या आवारात एक मोठा साप पोलीस हवालदार पवार यांना दिसला.

हेही वाचा: ठाण्यात भाजपा कार्यकर्त्यांकडून पाकिस्तानच्या ध्वजाचे दहन

घाबरलेल्या पवार यांनी तात्काळ इतर पोलीस कर्मचाऱ्यांना सावध केले. तसेच याची माहिती वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार ज्ञानेश शिरसाठ यांना दिली. शिरसाठ हे पोलीस हवालदार असले तरी ते सर्पमित्र म्हणूनही पोलीस दलात ओळखले जातात. त्यांनी तात्काळ नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन घोणस सापाला पकडले. त्यानंतर पोलिसांचा जीव भांड्यात पडला. यापूर्वीही नौपाडा पोलीस ठाण्यात एक विषारी साप आढळला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A venomous snake entered the naupada police station and the employees were in a panic in thane news tmb 01
First published on: 18-12-2022 at 12:49 IST