मुंब्रा येथील गावदेवी भागातील बाह्यवळण मार्गलगतच्या दोन घरांवर डोंगरावरील दगड कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली। डोंगरावरील आणखी काही दगड कोसळण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील वस्तीमधील एकूण १४ सदनिका रिकाम्या करून रहिवाशांची राहण्याची व्यवस्था जवळच्या महापालिका शाळेमध्ये करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> ठाणे : प्रबोधनकारांच्या विचारांमुळेच शिवसेनेसोबत युती ; संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कविता सुनिल वानपसरे (३५ ) यांचा मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मुंब्रा येथील गावदेवी भागातील बाह्यवळण मार्गलगत वस्ती आहे. डोंगरावरील दगड उंचावरून या वस्तीमधील साईकृपा चाळीतील सुनिल वानपसारे यांच्या आणि गजराज या चाळीतील मारुती सुर्यवंशी यांच्या घरावर कोसळल्याने दोन्हीही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी- कर्मचारी, मुंब्रा प्रभाग समितीचे कार्यालयीन अधिक्षक व त्यांचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, वनविभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग (महाराष्ट्र शासन) चे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक आमदार आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी भेट दिली. या ठिकाणी डोंगरावरील आणखी काही दगड कोसळण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने खालील वस्तीमधील एकूण १४ सदनिका रिकाम्या करून रहिवाश्यांची राहण्याची व्यवस्था जवळच्या महापालिका शाळेमध्ये करण्यात आली आहे.