भरधाव वेगाने रिक्षा चालवून एका रिक्षा चालकाने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. रिक्षेच्या धडकेत दुचाकीवरील आई, मुलगा दुचाकीवरुन रस्त्यावर पडले. या धडकेत दुचाकी चालविणारी आई गंभीर जखमी झाली आहे. मुलाला मुका मार लागला आहे. कल्याण जवळील आंबिवली जवळ ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

हेही वाचा >>> केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा डोंबिवली दौरा; चौकाचौकात भाजपाकडून बॅनरबाजी

या घटनेनंतर दुचाकी वरील जखमी दुचाकी स्वार, त्यांच्या मुलाला मदत करण्याऐवजी रिक्षा चालक घटस्थळा वरुन पळून गेला. ख़डकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी सांगितले, रेखा शिवाजी फटांगरे (रा. राहुल रेसिडेन्सी, आंबिवली, मोहने, कल्याण) या शुक्रवारी रात्री कामावरुन घरी परत आल्या. त्यावेळी त्यांना आपल्या मुलाला ताप आल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ आजारी मुलाला आपल्या दुचाकीवर बसवून बिर्ला महाविद्यालया जवळील आतीश रुग्णालय येथे नेले. तेथे उपचार घेऊन त्या रात्री १० वाजता दुचाकी वरुन घरी परत येत होत्या. त्यांच्या पाठीमागे मुलगा बसला होता.

हेही वाचा >>> शैक्षणिक संस्थांनी कौशल्य प्रशिक्षणावर भर द्यावा ; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे कल्याण मध्ये प्रतिपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेखा आंबिवलीतील बंदरपाडा, मोहन खेडा इमारती समोरुन जात असताना अचानक पाठीमागून भरधाव वेगाने एक रिक्षा चालक आला. तो बाजुने जाईल म्हणून रेखा यांनी आपली दुचाकी बाजुला घेतली. तरीही त्या बेशिस्त रिक्षा चालकाने रेखा यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत रेखा यांच्यासह त्यांचा मुलगा रस्त्यावर दुचाकीसह पडले. त्यांच्या हातापायाला दुखापत झाली. मुलाला मुका मार लागला. यावेळी जखमी आई, मुलाला मदत करण्याऐवजी रिक्षा चालक घटना स्थळावरुन पळून गेला. पादचाऱ्यांनी रेखा, त्यांच्या मुलाला रस्त्यावरुन उचलून बाजुला ठेवले. नंतर त्यांना घरी पोहचविले. गंभीर जखमी झाल्याने रेखा यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रिक्षा चालकाने मद्यपान करुन रिक्षा चालविली असण्याचा संशय पोलिसांना आहे. या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने पोलीस बेशिस्त रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत.