कल्याण मध्ये एका १२ वर्षाच्या मुलीची रस्त्याने जात असताना एका मुलाने छेड काढली. घडला प्रकार मुलीने घरी वडिलांना सांगितला. वडिलांनी आपल्या चार साथीदारांना सोबत घेऊन त्या मुलाचा कल्याण रेल्वे स्थानक भागात शोध घेऊन त्याला पकडून त्याचे अपरहण केले. त्याला पत्रीपुला जवळ नेऊन बेदम झोडपून काढले. मंगळवारी ही घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>डोंबिवली शिवसेना मध्यवर्ति शाखा शिंदेंच्या ताब्यात ; शिंदे समर्थकांनी खरेदी केली शिवसेना शाखेची जागा

या प्रकरणात मुलीचे वडील आणि त्यांच्या चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.कल्याण मध्ये राहत असलेल्या नुपूर चव्हाण या तरुणाने रस्त्याने जात असताना एका अल्पवयीन मुलीची छेड काढली. या मुलीने त्या तरुणाला जागीच प्रत्युत्तर दिले. घडला प्रकार तरुणीने घरी वडिलांना सांगितला. वडिलांनी आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. त्या मुलाचा कल्याण रेल्वे स्थानक भागात शोध घेतला. नुपूर शिवाजी चौकात आढळला. त्याला मुलीचे वडील आणि त्यांच्या चार साथीदारांनी पकडून पत्रीपूल परिसरात नेले. तेथे त्याला माझ्या मुलीची छेड का काढली. असा प्रकार परत कोणाच्या बाबतीत करशील का असे प्रश्न करत त्याला पाच जणांनी मिळून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील किल्ले बांधणी स्पर्धेत विवेकानंद सोसायटीचा विशाळगड ते पन्हाळा किल्ला प्रथम

मारहाण झालेल्या तरुणाने मोठ्या मुश्किलीने टोळक्याच्या तावडीतून सुटका करुन घेतली. तो थेट महात्मा फुले पोलीस ठाण्यात गेला. घडला प्रकार त्याने पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन मुलीचे वडील राहुल सोनावणे, सोनू शेख, गणेश अहिरे, संजय गुप्ता, दीपक वाघ यांना अटक केली.अल्पवयीन मुलीची छेड काढली म्हणून पोलिसांनी नुपूर विरुध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायद्याने गुन्हा दाखल केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man who molested a minor girl was kidnapped and brutally beaten amy
First published on: 27-10-2022 at 16:45 IST