नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिलीप माळवे याच्याविरोधात शुक्रवारी रात्री लाचेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४२० कलमांतर्गत कारवाई टाळण्यासाठी माळवे याने तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>ठाणे जिल्हा गारठला;बदलापूरमध्ये यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद

तक्रारदार हे ठाण्यात राहतात. त्यांच्याविरोधात एका व्यक्तीने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रारीअर्ज केला होता. दुकान भाड्याने देत असल्याचे सांगत त्या व्यक्तीकडून तक्रारदाराने ३ लाख ७५ हजार रुपये घेतल्याचे अर्जात म्हटले होते. या अर्जाची चौकशी माळवे यांच्याकडे होती. त्यावेळेस माळवे याने ‘तुमच्यावर ४२० कलमांतर्गत गुन्हा दाखल करतो’ असे धमकावत गुन्हा दाखल नसेल करायचे तर २५ हजार रुपये द्यावे लागतील असे तक्रारदाराला सांगितले.

हेही वाचा >>>बदलापुरातील नाल्यात मृत डुकरे

या घटनेनंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. याप्रकरणाची विभागाने तपासणी केली असता, माळवे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार माळवे याच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acb action against police constable of naupada police station amy
First published on: 10-12-2022 at 13:15 IST