ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात आज यंदाच्या मोसमातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. बदलापूरमध्ये आज १०.२ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. खासगी हवामान तज्ज्ञ अभिजीत मोडक यांनी त्यांच्या स्वयंचलित हवामान केंद्रात या नीचांकी तापमानाची नोंद केली. तर ठाणे जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून गारवा जाणवतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>बदलापुरातील नाल्यात मृत डुकरे

गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात गारठा वाढला होता. तापमानाचा पारा हा ११ ते १३ अंशांच्या दरम्यान होता. यापूर्वी २० नोव्हेंबर रोजी बदलापूर शहरात ११.२ अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. मात्र आज बदलापुरात पारा आणखी घसरला आणि १०.२ अंश तापमानाची नोंद झाली. बदलापूरमधील खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी त्यांच्या खासगी स्वयंचलित हवामान केंद्रात ही नोंद केली. बदलापूर शहर हे समुद्रापासून दूर असल्यामुळे हवेतली आर्द्रता ही हिवाळ्यात कमी होते. उत्तरेकडून येणारे थंड वारे बदलापूर शहरात आधी पोहोचतात आणि ते मुंबईच्या दिशेने वाहत जातात. त्यामुळे बदलापूर शहरात कमी तापमानाची नोंद होऊन पुढे अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यामार्गे मुंबईत हे तापमान वाढत जाते. त्यामुळेच उल्हासनगरमध्ये १२.४, कल्याणमध्ये १२.८, डोंबिवलीत १३.४, ठाण्यामध्ये १५.४ तर मुंबईत आज १६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.


हेही वाचा >>>चिखलोलीतील कचराभूमी तात्काळ बंद करा; राष्ट्रीय हरित लवादाचे अंबरनाथ पालिकेला आदेश, रहिवाशांकडून स्वागत

बदलापूर १०.२
कर्जत १०.४
उल्हासनगर १२.४
कल्याण १२.८
डोंबिवली १३.४
ठाणे १५.४
नवी मुंबई १५.६

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur recorded the lowest temperature of this winter season amy
First published on: 10-12-2022 at 12:36 IST