ठाणे : देशभरात भटक्या श्वानांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील प्राणीप्रेमी संघटना आक्रमक होत्या. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नव्या आदेशाविरोधात सिटिझन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (CAP) फाउंडेशन आणि डॉग मंत्रा या संस्थांच्यावतीने शनिवारी उपवन तलाव ॲम्फीथिएटर येथे शांततामय आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान प्राणीप्रेमींनी भटक्या श्वानांसाठी आश्रयस्थान, खाद्यव्यवस्था आणि योग्य कचरा व्यवस्थापनाची मागणी केली. आजारी किंवा पिसाळलेल्या श्वानांसाठी आश्रयस्थान आवश्यक आहे. मात्र निरोगी आणि शांत श्वानांना जबरदस्तीने तिथे ठेवणे अयोग्य असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राजधानी दिल्लीतून ताब्यात घेतलेल्या सर्व भटक्या श्वानांना लसीकरण आणि निबिजीकरण केल्यानंतर सोडण्यात येणार आहे. यात फक्त रेबिजची लागण झालेल्या किंवा आक्रमक वर्तन करणाऱ्या श्वानांनाच निवारा केंद्रात ठेवले जाणार आहे. या आदेशामुळे प्राणीप्रेमी भावनिक झाले असून श्वानांमुळे होणाऱ्या इजा आणि नागरिकांच्या तक्रारी या दोन्ही बाजू समोर आल्या आहेत. श्वानांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या विरोधात ठाण्यातील सिटिझन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (कॅप) फाउंडेशन आणि डॉग मंत्रा या प्राणीप्रेमी संस्थांच्या पुढाकाराने उपवन तलाव येथे शनिवारी शांततामय आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान प्राणीप्रेमींनी श्वानांसाठी आश्रयस्थान, खाद्यव्यवस्था आणि योग्य कचरा व्यवस्थापनाची मागणी केली. आजारी आणि पिसाळलेल्या श्वानांसाठी आश्रयस्थान हवेत, मात्र निरोगी तसेच शांत श्वानांना जबरदस्तीने तिथे ठेवणे अयोग्य आहे, असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर श्वानांना खायला घालायला एक स्वतंत्र जागा हवी, तसेच कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पालिकेने सोडवायला हवा. कचरा योग्य प्रकारे उचलला आणि त्यांची विल्हेवाट लावली तर श्वानांचा उपद्रव आपोआप कमी होईल असे आंदोलनात बोलताना प्राणीप्रेमींनी नमूद केले.

लसीकरणासाठी आवश्यक कोल्ड चेन व्यवस्थेवर लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये श्वानांबाबत जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. सोसायट्यांमध्ये आणि शाळांमध्ये योग्य माहिती पोहोचवणे गरजेचे. विशेषतः मुलांमध्ये चावण्याच्या घटना जास्त प्रमाणात होत असल्याने शालेय पातळीवर जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाण्यात प्राणीप्रेमी संघटनेच्यावतीने श्वानांसंबंधीचे विविध प्रयत्न केले जात आहेत. ते योग्यरित्या अंमलात आले, तर त्यातून संपूर्ण देशासाठी चांगले उदाहरण तयार होईल. श्वान चावण्याच्या सर्वाधिक घटना या मुलांसंबंधीच्या असतात. त्यामुळे शाळकरी मुलांपर्यंत श्वानांसंबधीत माहिती देणे गरजेचे आहे. तसेच श्वानांना लस देणे, त्यांची जनसंख्या नियंत्रित करणे आणि लोकांमध्ये जनजागृती करून यथोचित माहिती देणे महत्वाचे आहे, असे डॉग मंत्राचे आकाश शुक्ला यांनी सांगितले.