ठाणे शहरात करोना आणि ‘एच ३ एन २’ इन्फ्ल्युएंझा या आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ होत असतानाच, शहरात करोनामुळे एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला आहे. शहरातील हा चौथा मृत्यु आहे. त्यामुळे गेल्या १२ दिवसांत शहरामध्ये करोनामुळे चार जणांचा मृत्यु झाल्याचे चित्र आहे.ठाणे शहरात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून करोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. शहरात आतापर्यंत ४४७ रुग्ण आढळून आले आहेत. शहरात सद्यस्थितीत २४६ सक्रीय रुग्ण आहेत. त्यापैकी २२१ रुग्ण घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या; करमुसे प्रकरणात झाली होती अटक

उर्वरित रुग्ण पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहरात करोनाचा नवा उपप्रकार ‘एक्सबीबी.१.१६’ चे नऊ रुग्ण आढळून आल्याची बाब जनुकिय क्रमनिर्धारण चाचणी अहवालातून पुढे आली आहे. यामुळे शहराच्या आरोग्य चिंतेत वाढ झाली आहे. दररोज ५० च्या आसपास रुग्ण आढळून येत असून आतापर्यंत ३ जणांचा मृत्यु झाला आहे. असे असतानाच, कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला असून ती मुरबाड भागातील रहिवाशी होती. तसेच तिला सहव्याधी होत्या, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another death due to corona in thane amy
First published on: 29-03-2023 at 18:08 IST