मनसे नेते संदीप देशपांडे हे सकाळी चालण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. याप्रकारानंतर पोलिसांनी ठाण्यातील चिरागनगर येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले. या संशयितांच्या घराबाहेर जाऊन मनसेच्या नेते अविनाश जाधव हे कार्यकर्त्यांसह धडकले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी एका महिलेसोबत मनसेच्या कार्यकर्त्यांचा वादही झाला.

हेही वाचा >>>डोंबिवलीत सायकल चोर अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाजी पार्क मैदानाजवळ संदीप देशपांडे चालत असताना दोन जणांनी त्यांच्यावर बॅट आणि स्टंपने हल्ला केला होता. या घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांची विविध पथके तपास करीत आहेत. ठाण्यातील चिरागनगर परिसरातूनही पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मनसेचे नेते अविनाश जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांच्यासह शेकडो कार्यकर्ते त्या दोघांच्या घराबाहेर धडकले. यावेळी येथील एका महिलेसोबत मनसेच्या कार्यकर्त्यांचा वादही झाला. अखेर पोलिसांचे पथक आल्यानंतर त्यांनी गर्दी पांगवली.