barvi dam has 31 percent water storage zws 70 | पाणीकपातीचे संकट ; बारवी धरणात अवघा ३१ टक्के पाणीसाठा | Loksatta

पाणीकपातीचे संकट ; बारवी धरणात अवघा ३१ टक्के पाणीसाठा; जून महिन्यात जेमतेम १२९ मिमी पावसाची नोंद

मे महिन्याच्या अखेरीसच राज्यात दाखल होण्याची आशा असलेल्या मान्सूनने यंदा उशीर केला.

पाणीकपातीचे संकट ; बारवी धरणात अवघा ३१ टक्के पाणीसाठा; जून महिन्यात जेमतेम १२९ मिमी पावसाची नोंद
संग्रहित छायाचित्र

बदलापूर: हवामान खात्याचे भाकीत खोटे ठरवत जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्याचवेळी जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात आजघडीला केवळ ३१ टक्के पाणीसाठा आहे. पावसाची परिस्थिती अशीच राहिल्यास मुंबई शहराप्रमाणे ठाणे जिल्ह्यातही पाणीकपात करावी लागू शकते.

मे महिन्याच्या अखेरीसच राज्यात दाखल होण्याची आशा असलेल्या मान्सूनने यंदा उशीर केला. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद  झाली. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ४०० मिलिलिटर पावसाची नोंद जून महिन्यात केली जाते. गेल्या वर्षांत ठाणे जिल्ह्यात ६६६.६ मिलिलिटर पावसाची नोंद झाली होती. सरासरीच्या १६५.५ टक्के अधिक पाऊस पडला होता. त्यामुळे जलस्रोतांमध्ये पुरेसा पाणी साठा उपलब्ध झाला होता. यंदा मात्र पावसाने ओढ दिल्याने जलस्रोतातील पाणीसाठी झपाटय़ाने कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात २७ जूनपर्यंत अवघ्या ३२.३ टक्के पावसाची नोंद झाली असून अवघा १२९.४ मिलिलिटर पाऊस पडला आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात पावसाने सरासरी गाठली नाही तर जिल्ह्यावर पाणीकपातीचे संकट ओढवू शकते.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, ठाणे, मीरा भाईंदर आणि ग्रामीण भाग तसेच औद्योगिक वसाहतींना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. तर आंध्र धरणातून आणि भिवपुरी विद्युत प्रकल्पातून येणाऱ्या पाण्यामुळे उल्हास नदीची पाणी पातळी राखली जाते. मात्र कमी पावसामुळे सध्याच्या घडीला जलस्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याचे समोर आले आहे. बारवी धरणाची पाणीसाठा क्षमता ३३८.८४ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. मात्र सध्याच्या घडीला बारवी धरणात १०७.७९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूण क्षमतेच्या हे प्रमाण अवघे ३१.३६ टक्के इतके आहे. गेल्या वर्षांत हाच पाणीसाठा ३८.८८ टक्के इतका म्हणजे १३१.७३ दशलक्ष घनमीटर इतका होता. येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर जिल्ह्यावर पाणी संकट ओढावण्याची शक्यता आहे. 

३० जून रोजी आढावा

येत्या ३० जून रोजी जलसंपदा विभाग संबंधित विभागांसोबत जिल्ह्यातील जलस्त्रोतांमध्ये उपलब्ध पाणी साठय़ाचा आढावा घेतील. तोपर्यंत पाऊस आला नाही आणि जलस्त्रोतांतील पाण्याची पातळी खालावणे सुरूच राहिल्यास जिल्ह्यावर पाणीकपातीचे संकट अटळ असल्याचे मत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

अघोषित पाणीकपात सुरूच

देखभाल आणि  दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या काही दिवसात काही तासांपासून ते एक दिवसापर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवला जातो आहे. ही अघोषित पाणीकपातच असल्याच्या भावना आता नागरिक व्यक्त करू लागले आहेत. गेल्या काही दिवसात ठाणे, कल्याण डोंबिवली भागात दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवला होता.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भूसंपादनातील दिरंगाईमुळे रेल्वे उड्डाणपुलास विलंब ; दिवा पूर्वेकडील इमारतींचे पाडकाम रखडले

संबंधित बातम्या

कल्याणमधील पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील छत कोसळले
डोंबिवली-कल्याण मधील २५० बेशिस्त रिक्षा चालकांवर ‘आरटीओ’ची कारवाई , दोन लाख ६० हजाराचा दंड वसूल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
नोटाबंदीबाबत मूकदर्शक बनणार नाही!; सर्वोच्च न्यायालयाने रिझव्‍‌र्ह बँकेला सुनावले
गोवर लसीकरण मोहीम दोन टप्प्यांत
Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक एसटी सेवा तूर्तास बंद; ६६० बस फेऱ्यांवर परिणाम
मुंबईतील हवा ‘अत्यंत वाईट’; धुरक्याच्या प्रमाणात वाढ
चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम नव्या शैक्षणिक वर्षांपासून; उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे निर्देश