कल्याण – येथील पूर्व भागातील मालगाड्यांचा थांबा असलेल्या ठिकाणी खेळण्यासाठी आलेला एका १३ वर्षाचा मुलगा मंगळवारी दुपारी खेळताना यार्डातील एका मालगाडीवर चढला. वरील ओव्हर हेड वायरशी त्याचा संपर्क आल्याने त्याला विजेचा जोराचा धक्का बसून तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मुंबईतील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>> आश्रमशाळेतील अन्नपदार्थ वर्षश्राद्धाचे; आश्रमशाळेतील अधीक्षकासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल

खडेगोळवली भागात राहणारा समीर बेग (१३) हा मुलगा शाळा सुटल्यावर घरी आला. आपण कबड्डी खेळण्यास जात आहे असे सांगून तो रेल्वे यार्डात आला. तेथे मालगाड्या थांबलेल्या होत्या. एका मालगाडीच्या टपावर समीर चढला. जिवंत ओव्हर हेड वायरशी त्याचा संपर्क आल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसून तो जागीच कोसळला. तो ८० टक्के होरपळला आहे.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये रस्ते भूमिपूजनावरून आमदार गणपत गायकवाड यांना रोखण्याचा प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोहमार्ग पोलिसांना ही माहिती मिळताच त्याला पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने मुंबईत हलविण्यात आले. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. रेल्वे यार्ड भागात रेल्वे सुरक्षा बळाचे जवान तैनात असतात. तरीही त्यांची नजर चुकवून समीर यार्डात आला कसा, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.