डोंबिवली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने राष्ट्रभक्त सावकर यांचा अवमान केला जात असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी ब्राह्मण महासंघाकडून डोंबिवली शहराच्या विविध भागांतील रस्त्यांवर राहुल गांधी यांचा निषेध करणारे फलक लावण्यात आले आहेत.

हेही वाचा – शिंदेंच्या ठाण्यावर भाजपचे लक्ष; लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी बैठकांचे सत्र

हेही वाचा – तुम्ही पाण्यात बुडणारे दगड; मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी स्वा. सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करून सावरकरांची बदनामी करत आहेत. त्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध करण्यासाठी ब्राह्मण महासंघाने डोंबिवली शहराच्या विविध भागांत फलक लावले आहेत. राहुल गांधी यांच्या सावकरांविषयीच्या वक्तव्याचा देशभर निषेध केला जात आहे. त्यामुळे त्यांनी आता तरी योग्य धडा घ्यावा. सावकरांविषयी विधाने करू नयेत. स्वा. सावरकर यांच्याविषयी बोलण्यापूर्वी प्रथम समग्र सावकर ग्रंथ वाचून काढावा, असे आवाहन ब्राह्मण महासंघाचे मानस पिंगळे यांनी केले. डोंबिवलीत रविवारी सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.