लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उल्हासनगरः राज्यात शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवत असताना दुसरीकडे सेतू कार्यालयात लाचखोरी सुरूच असून छोट्या वेतन योजनेसाठीही चिरीमिरी घेतली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरात सेतू संचालक आणि सहसंचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून त्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज वेगाने मार्गी लावण्यासाठी २०० रूपयांची लाच स्विकारली.

आणखी वाचा- डोंबिवलीतील गरीबाचापाडा भागात विजेचा लपंडाव

उल्हासनगर कॅम्प पाच येथील तहसिल कार्यालयात सेतू उपक्रमातून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वेतनाकरिता लागणारा उत्पनाचा दाखला देण्याकरिता सेतू संचालक राजेंद्र सानप यांनी अर्जदारांना सेतू सहसंचालक सहदेव सुर्यवंशी यांना भेटण्यास सांगितले होते. सानप साहेब अर्ज जमा करून पुढील काम साहेबांना सांगून लवकर करून देण्यासाठी २०० रूपये घेतात असे सुर्यवंशी याने अर्जदाराला सांगितले. त्यानंतर १७ मे रोजी लावलेल्या सापळ्यात सहसंचालक सुर्यवंशी यांनी २०० रूपयांची लाच स्विकारली. त्यास सेतू संचालक सापनप यांनी संमती दिली. दोन्ही आरोपी यांनी आपला वैयक्तीक प्रभाव वापरून शासकीय विभागातील काम करून देण्याकरिता लाचेची रक्कम स्विकारली असताना सेतू सहसंचालक सहदेव सुर्यवंशी आणि सेतू संचालक राजेंद्र सानप यांना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमान्वये दोन्ही आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bribery in niradhar yojana setu director along with co director arrested in thane mrj
First published on: 18-05-2023 at 12:01 IST