नंदीबैला भोवतीची गर्दी ओसरली

डोंबिवली – पाऊस ओसरला की राज्याच्या विविध भागातील नंदीबैल मालक ऑक्टोबरमध्ये कोकण पट्ट्यात नंदीबैल घेऊन मनोरंजनासाठी निघतात. आठ महिने म्हणजे पाऊस पडेपर्यंत नंदीबैल मालकांचा नंदीबैलासह कोकण पट्टीत मुक्काम असतो. गावोगावी, शहरांच्या विविध भागात जाऊन नंदीबैलाच्या माध्यमातून मनोरंजनाचे खेळ करून नंदीबैलाच्या माध्यमातून काही कुटुंबे उपजीविका करतात. आता नंदीबैल मालक मनोरंजनाच्या ठिकाणी गेल्यावर व्हाॅट्सपमध्ये दंग असल्याचे आणि नंदीबैल चर्वण करत उभे असल्याचे चित्र दिसत आहे.

व्हाॅट्सपमध्ये दंग आणि गुंगीमुळे प्रत्येक नागरिक व्यस्त झाला आहे. त्याचप्रमाणे नंदीबैल मालकही सकाळी आठ वाजता नंदीबैल घेऊन आपल्या राहुटीतून बाहेर पडला की गाव, शहरातील मोकळ्या मैदानात जाऊन नंदीबैल आल्याची आरोळी ठोकत आहेत. जवळील ढोलके जोरजोराने विशिष्ट लयीत वाजवून नागरिकांना नंदीबैलाची दर्शन घेण्यासाठी पाचारण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पण, नोकरी, व्यवसाय, शाळा अशा अनेक धबडग्यात व्यस्त असलेला नागरिक आणि नंदीबैलाचे विशेष आकर्षण असणारी शाळकरी मुले आता शाळा, खासगी शिकवणी आणि क्रीडा, गायन, नृत्य अशा सगळ्या प्रकारांमध्ये व्यस्त राहत असल्याने नंदबैलाचे नागरिक, मुलांकडून उत्सुकतेने यापूर्वीसारखे स्वागत होत नाही. आपल्या घराच्या दारात आलेला नंदीबैल आता ‘एकाकी’ पडला आहे.

आता नंदीबैल दारात आल्यानंंतर ढुमढुम ढुमाक वाजू लागले की नंदीबैलाचे साथी मोठ्या ओरडून परिसराला शिवाचा नंदीबैल आला. दर्शनासाठी या म्हणून नागरिकांना बोलवितात. पण, गडबडीत असलेला नागरिक खिडकीतून डोकावून पुन्हा आपल्या कामात व्यस्त होतो. काही श्रध्दाळू मंडळी नंदीबैलाला चपाती, खाऊ, फळे चारतात. काही पाणी पाजतात. पण, यापूर्वी नंदीबैलाच्या माध्यमातून बैलाचे साथी वर्षभराचे भविष्य नंदीबैलाकडून वदवून घ्यायचे. त्याच एक वेगळी मजा असायची. काही मनोरंजनाचे आश्चर्यकारक खेळ करून घ्यायचे. हे सगळे प्रकार आता नंदीबैल साथींकडून बंद झाले आहेत.

आता नंदीबैलाचा साथी नंदीबैलाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्यांना नागरिकांना त्याचे ग्रहमानाप्रमाणे भविष्य वर्तवून खिळवून ठेवतात. त्यानंतर मोठ्या दक्षिणेची मागणी करतात. अतिशय आग्रहाने ही मागणी केली जात असल्याने नागरिक अलीकडे नंदीबैल आला की दरवाजा, खिडकी बंद करून दूरवरून नंदी पाहणे पसंत करतात. यापूर्वी नंदीबैल गावात, शहरात आली की एक ते दीड तास विविध प्रकारचे खेळ नंदीबैलाच्या माधयमातून नागरिकांना पाहण्यास मिळत होते. त्यामुळे नंदीबैलाजवळ लहान मुले, नागरिकांची तुडुंब गर्दी होत होती.

भीत पीक जोरात आल्याने नंदीबैलाच्या नावे शिधा दिला जात होता. आता हे सगळे प्रकार थांंबले आहेत. त्यामुळे नंदीबैल दारात आला की लोक आपल्या गडबडीत असल्याने नंदीबैल साथीही लोक नंदीबैल दर्शनासाठी येत नाहीत म्हणून आपल्या व्हाॅट्सपमध्ये दंग राहत आहेत. आता मनोरंजनाचे काही कामच नाही आणि कोणाचे भविष्यकथन कथन करावे लागत नसल्याने नंदीबैलही मालक व्हाॅसपमध्ये दंग असल्याचे पाहून स्वता चर्वण करत मस्त आराम करत उभा राहून चर्वण करत आहे. त्यामुळे व्हाॅसप गुंगीचा आता नंदीबैलालाही फटका बसल्याचे चित्र आहे.