ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली भागात शनिवारी रात्री एका व्यावसायिकाची भर रस्त्यात  धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी कर सल्लागार भूषण पाटील आणि साथीदार नितीन पाटील यांना ताब्यात घेतले आहे. दीड कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून त्यांनी हत्येची सुपारी दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हत्या झाली तेव्हा भूषण पाटील हा व्यवसायिकासोबत मोटारीमध्ये होता. 

हेही वाचा >>> ठाणे : गायमुख खाडीत मृतदेह आढळला

सतीश पाटील असे हत्या झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. ते वर्तकनगर येथील देवदयानगर परिसरात राहतात. शनिवारी रात्री सतीश हे त्यांच्या मोटारीने ओवळा भागात आले होते. त्यावेळी मोटारीमध्ये भूषण आणि नितीन  हे होते.  ओवळा येथील विहंग व्हॅली चौकात आले असताना, भूषण हा कामानिमित्ताने मोटारीतून खाली उतरला. त्याचवेळी दुचाकीवरून दोनजण त्याठिकाणी आले. त्यांनी सतीश यांची मोटारीत  धारदार शस्त्राने हत्या केली. यावेळी हत्येचा आरोप होऊ नये यासाठी भूषण याने हल्लेखोरांकडून स्वत:च्या हातावर वार करून घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कासारवडवली पोलिसांचे पथक आणि ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी भूषण याची कसून चौकशी केली असता, त्याने दीड कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारातून सतीश यांची हत्येची सुपारी दिल्याचे कबूल केले.