ठाणे : शिळ डायघर येथील एका मंदिरात आलेल्या महिलेवर मंदिरातील सेवेकऱ्यांनी सामूहिक लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातील आरोपी श्यामसुंदर शर्मा (६२), संतोषकुमार मिश्रा (४५) आणि राजकुमार पांडे (५४) यांना शुक्रवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा – कल्याण, डोंबिवलीतील रेल्वे स्थानके परिसर फेरीवाला आणि वाहन कोंडी मुक्त करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश

हेही वाचा – आमदार राजू पाटील यांचा नातेवाईक असल्याचे सांगून ५० हून अधिक जणांना गंडा घालणारा अटकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबईत राहणाऱ्या विवाहित महिलेचा सासरी छळ होत होता. या छळाला कंटाळून संबंधित महिला ६ जुलैला शिळगाव येथील एका मंदिरात गेली होती. तेथील मंदिरातील सेवेकरी श्यामसुंदर शर्मा, संतोषकुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे यांनी तिला चहामध्ये भांगेच्या गोळ्या देऊन तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केले. महिला शुद्धीत आल्यानंतर तिने आरडाओरड करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तिघांनी तिला पकडून मारहाण केली. त्यानंतर तिचे डोके दगडावर आपटून तिचा गळा दाबून हत्या केली. तसेच तिचे प्रेत मंदिर परिसरात फेकून दिले. मृतदेह आढळून आल्यानंतर शिळ डायघर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेऊन मंदिरातील सेवेकऱ्यांना अटक केली. परंतु या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे. शुक्रवारी या तिन्ही आरोपींना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.