मोठ्या कंपनीत संचालकपदी नोकरी लावून देतो माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करणाऱ्या एका ५४ वर्षीय व्यक्तीची तीन भामट्यांनी ६ लाख रुपयांची फसणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली-कल्याणमधील १५०० वाहन चालकांवर वाहतूक विभागाची कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्तकनगर भागात फसवणूक झालेले व्यक्ती राहतात. ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सल्लागार म्हणून काम पाहतात. मे महिन्यात त्यांना तीन जणांनी संपर्क साधला होता. एका मोठ्या कंपनीत संचालक म्हणून नोकरी देतो असे सांगून त्या भामट्यांनी टप्प्या-टप्प्याने ६ लाख ६ हजार ६३७ रुपये घेतले. अनेक दिवस उलटत असतानाही त्यांना कोणतीही नोकरी त्यांनी दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.