महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीला अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाईन प्रणालीतून भामट्याने विद्यार्थिनीची दोन लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. नोकरी नाहीच, पण घेतलेले पैसे परत मिळणार नाहीत याची खात्री झाल्यावर तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

पूजा चिमाजी यादव (२०, सिध्दी पार्क, देशमुख होम्स, टाटा पाॅवर, कल्याण पूर्व) असे तक्रारदार तरुणीचे नाव आहे. पूजा ही महाविद्यालयीन शिक्षण घेते. शिक्षण घेत असताना अर्धवेळ नोकरी करावी म्हणून पूजा कंपनी, खासगी एजन्सीमध्ये काम शोधत आहे. यासाठी ती ऑनलाईन, वर्तमानपत्रातील जाहिराती बघते. अशाच एका संपर्कातून पूजा यादवला एका भामट्याने टेलिग्रॅम उपयोजन वरुन संपर्क केला.

हेही वाचा : कल्याण : शहाड पुलावरील महिलेच्या मृत्युप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल

तिला अर्धवेळ नोकरी देण्याचे आमिष दाखवले. काम मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही रक्कम तुला भरावी लागेल असे सांगून भामट्याने पूजा यादवच्या स्टेट बँक, ॲक्सिस, फेडरल बँकेच्या बचत खात्यांमधून एकूण दोन लाख २६ हजार ३८ रुपये वेगवेगळ्या ठिकाणांहून ऑनलाईन पध्दतीने काढून स्वताच्या बँक खात्यात वळते केले.

हेही वाचा : अंबरनाथ, डोंबिवली गणपती दर्शन भ्रमंतीत खा. श्रीकांत शिंदे यांचा सोमवारी पहाटे कल्याण मधील चहा-मलई पाववर ताव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रक्कम भरणा केल्यानंतर आपणास कामाचे नियुक्ती पत्र मिळेल असे पूजाला वाटले. तसे आश्वासन भामट्याने पूजाला दिले होते. पैसे भरुन झाल्यानंतर भामटयाने पूजाला उत्तर देणे टाळले. तिच्या मोबाईलला तो प्रतिसाद देण्यास टाळाटाळ करू लागला. भामट्याचा मोबाईल फोन नंतर बंद झाला. नोकरीचे आमिष दाखवून आपली भामट्याने फसवणूक केली म्हणून पूजाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गु्न्हा दाखल केला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. लांडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.