डोंबिवली पश्चिमेतील शहराच्या मध्यवर्ति ठिकाणचे ज्येष्ठ नागरिकांचे विसावा, क्रीडाप्रेमींचे खेळाचे मैदान १४ दिवस कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता विभागाने मालवणी जत्रोत्सव कार्यक्रमासाठी दिल्याने ज्येष्ठ नागरिक, क्रीडाप्रेमी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.जागरूक रहिवाशांनी ऑनलाईन, टिवटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पालिकेने रहिवाशांच्या केलेल्या गैरसोयीबाबत तक्रारी केल्या आहेत. चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालिका हद्दीतील एकही खेळाचे मैदान विवाह, राजकीय कार्यक्रमांसाठी दिले जाणार नाही असा निर्णय घेतला. या आश्वासनाचा आयुक्तांना विसर पडला का, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद म्हात्रे यांनी क्रीडाप्रेमी नागरिक, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय नको म्हणून भागशाळा मैदानात स्वखर्चाने दोन कुपनलिका बसून दिल्या. सकाळ, संध्याकाळ म्हात्रे यांनी नियुक्त केलेले कार्यकर्ते मैदानात पाणी मारून धूळ उडणार नाही याची काळजी घेतात. चारही बाजूने गर्द झाडी, पायाच्या टाचेपर्यंत धुळीचा थर असल्याने मैदानात क्रिकेट, बॅडमिंटन, हॉलिबॉल दररोज खेळले जातात. योग वर्ग मैदानात सुरू आहेत. शाळांना सुट्टी लागल्यापासून अनेक खेळ प्रशिक्षक मुलांना विविध खेळ प्रकार सकाळ, संध्याकाळ मैदानात शिकवतात. पहाटे चार वाजल्यापासून ते सकाळी १० वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत मैदानात ज्येष्ठ नागरिक महिला, पुरूष नातवंडांना घेऊन विरंगुळ्यासाठी येतात. प्रेमीयुगलांचा हा अड्डा आहे.

power play, eknath shinde, shiv sena, thane
ठाण्यात शिंदे सेनेचे महिला एकत्रिकरणातून शक्तिप्रदर्शन, रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार सखी महोत्सव
Police dressed as priests in Uttar Pradesh
अन्वयार्थ : पोलीस पुजारी.. की पुजारी पोलीस!
ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या पायी सहभागामुळे स्वागत यात्रा विस्कळीत
loksatta viva Artificial Intelligence Lok Sabha Election social media
AIच्या गावात!

हे सगळे प्रकार १४ दिवसांच्या जत्रोत्सवामुळे बंद राहणार असल्याने रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. करोना महासाथीमुळे दोन वर्ष घराबाहेर पडता न आल्याने अनेक रहिवासी सकाळ, संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडतात. मध्यवर्ति ठिकाणचे भागशाळा मैदान हे डोंबिवली पूर्व, पश्चिमेतील रहिवाशांना सोयीचे ठिकाण आहे. मैदान सकाळ, संध्याकाळ नागरिकांनी भरून गेलेले असते. जत्रोत्सवाच्या काळात फिरण्यासाठी लांबवर कसे जायाचे असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांसमोर आहे. मुलांचे खेळांचे प्रशिक्षण कुठे घ्यायचे असा प्रश्न क्रीडा प्रशिक्षकांसमोर उभा आहे.

भागशाळा मैदान परिसरातील रहिवासीही या महोत्सवाच्या आयोजनामुळे नाराज आहेत. महोत्सवासाठी येणारे हौशी मैदानाच्या चारही बाजुने चारचाकी, दुचाकी वाहने अस्ताव्यस्त उभे करतात. मैदानाच्या चार बाजुला फेरीवाले बसलेले असतात. जत्रोत्सव काळात महोत्सव मैदान परिसर वाहन कोंडीत अडकतो, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत.

डोंबिवलीत चांगली मैदाने नाहीत. लोकांना चांगले मैदान असावे या विचारातून आपण स्वखर्चाने भागशाळा मैदानात दोन कुपनलिका बसविल्या. मैदान सुस्थितीत राहिल यासाठी खासगी कर्मचारी तैनात केले आहेत. ते मैदानात पाणी मारतात. बाकड्यांची व्यवस्था आहे. या सुविधांमुळे बालकांपासून ते ज्येष्ठ, वृध्द मैदानात फिरण्यासाठी येतात. आता मैदान जत्रा कार्यक्रमासाठी दिल्याने रहिवाशांनी जायचे कुठे. एकीकडे आयुक्त माझे शहर सुदृढ शहर उपक्रम जोमाने राबवितात. दुसरीकडे मैदाने जत्रेला देऊन सुदृढ आरोग्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नागरिकांची गैरसोय करतात. – प्रल्हाद म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते, डोंबिवली पश्चिम

मालमत्ता विभागाने मैदान जत्रा कार्यक्रमाला देण्याचा निर्णय घेतला आहे. ह प्रभागाचा याच्याशी संबंध नाही. – अक्षय गुडधे, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग

मैदाने भाडे देण्याचे नवीन धोरण तयार होईपर्यंत जुन्या धोरणाने मैदान भाड्याने देण्याचे आयुक्तांनी सुचविले आहे. मैदान भाडे देण्याची प्रत्येक नस्ती आयुक्तांना दाखवूनच कार्यक्रमाना परवानगी दिली जाते. भागशाळा मैदानातील परवानगी आयुक्तांच्या मान्यतेने दिली आहे. – पल्लवी भागवत, उपायुक्त मालमत्ता विभाग