संगीतात जशी निरनिराळी घराणी असतात, तशीच ती खाद्यसंस्कृतीतही असतात. पदार्थ एकच असला तरी त्यात टाकले जाणारे घटक आणि बनविण्याच्या पद्धतीमुळे चवीत बदल झालेला दिसून येतो. वऱ्हाड, जळगाव, कोकण, आगरी आदी पद्धतीच्या जेवणाची स्वतंत्र ओळख आहे. तशीच सी.के.पी. मंडळींनीही आपल्या खाद्यसंस्कृतीची वैशिष्टय़पूर्ण खूण जपली आहे. ठाण्यातील ‘अंजोर-द किचन कॉर्नर’मध्ये सी.के.पी. खाद्यपदार्थाचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. त्यामुळे नुकत्याच थंडीची चाहूल लागलेल्या आल्हाददायक वातावरणात वेगळ्या चवीच्या शोधात असाल तर येथील सी.के.पी. चवीचा अनुभव घ्यायला हरकत नाही.

सी.के.पी. स्नॅक्स आणि अस्सल मराठमोळे पदार्थ मिळणारा हा कॉर्नर सुप्रिया दुर्वे यांनी दोन महिन्यांपूर्वी सुरू केला. या कॉर्नरचे वैशिष्टय़ म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने येथे पदार्थ बनविले जातात. त्यामुळे ग्राहकांना घरगुती चवीचा आनंद घेता येतो.

येथे आपल्याला कॉर्न पॅटिस, खिमा वडा-पाव, टेंडर चिकन, वाल लिपते, वडी संबार, वाल खिचडी, चिकन कायस्थ, कांद्यावरचे प्रॉन्स, सोडे घातलेले पोहे असा  वैशिष्टय़पूर्ण शाकाहारी आणि मांसाहारी नाश्ता आणि जेवणाच्या एकूण १०५ डिशेशची चव चाखायला मिळते. फ्लॉवर, गाजर, फरसबी, वाटाणा यांचं मिश्रण असलेले व्हेज कटलेट, कॉर्न मटार किंवा पनीर पॅटिस, मिसळ-पाव, वडा-पाव, पंजाबी सामोसा, आलूपनीर, मेथीपालक पराठा, घरच्या भाजणीचे थालीपीठ, कांदेपोहे, उपमा, आंबोळी, सँडविच, मटार करंजी अशा निरनिराळ्या शाकाहारी पदार्थाची चव आपल्याला नाश्त्यामध्ये चाखायला मिळते. या विविध शाकाहारी पदार्थाबरोबरच चिकन  किंवा मटण खिमा कांद्यावर परतून सी.के.पी. मटण मसाला टाकून तयार केलेलं चिकन किंवा मटण खिमा पॅटीस, वैशिष्टय़पूर्ण असं चिकन सॉसेज सँडविच, फ्रेंच आम्लेट, चिकनला आचारी मसाला लावून श्ॉलो फ्राय करून ग्रिल केलं जाणारं टेंडर चिकन, बटाटा वडय़ामधील बटाटय़ाच्या भाजीऐवजी खिमा टाकून केलेला आगळावेगळा असा खिमा वडा-पाव, मटण चॉप फ्राय, चिकन लॉलीपॉप असा चमचमीत नॉन व्हेज नाश्ता बघून तोंडाला एकदम पाणी सुटतं.

नाश्त्याबरोबरच जेवणामध्ये शाकाहारी थाळी, उसळ, पनीर किंवा पंजाबी भाजी आणि पोळी, उसळ पुरी, गावरान पिठलं किंवा झुणका भाकर असे शाकाहारी जेवण आणि अंड, चिकन, मटण किंवा फिश करी थाळी, खिमा थाळी, अंडाबुर्जी पाव, खिमा-पाव असे एकदम घरगुती पद्धतीचे शाकाहारी आणि मांसाहारी जेवणही येथे उपलब्ध आहे. याबरोबरच राईसमध्ये प्लेन राईस, जिरा राईस, अंडं, चिकन आणि मटण बिर्याणी तसेच व्हेज पुलावाचीसुद्धा येथे आपल्याला चव चाखायला मिळते.

किचन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुठे/, राम जानकी, घंटाळी मंदिराच्या जवळ, नौपाडा, ठाणे (.)