लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्त विसर्जनासाठी डोंबिवलीतील आयरे गावातील तलावावर जातात. तेथे स्वच्छता असावी. पर्यावरण स्वच्छतेचे महत्व मुलांना कळावे. भाविकांना सहजपणे गणपतीचे विसर्जन करता यावे म्हणून येथील टिळकनगर विद्यामंदिर, ध. ना. चौधरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आयरे गाव तलाव परिसराची नुकतीच स्वच्छता केली.

पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, पर्यावरण दक्षता मंडळाचे कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले होते. आयरे गाव तलाव परिसरात रानगवत, झुडपे वाढल्याने तलावाजवळ जाण्यात अडचणी होत्या. तलावांचे चौथरे, घाट, पायऱ्यांवर माती साचली होती. पूजेचे निर्माल्य, थर्माकोल तलावाच्या काठी आणून टाकण्यात आले होते.

हेही वाचा… डोंबिवलीत एकता क्रेडिट पतसंस्थेच्या शाखाधिकाऱ्याकडून ३८ लाखाचा गैरव्यवहार

टिळकनगर शाळेतील आणि ध. ना. चौधरी विद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या ७५ विद्यार्थ्यांनी छात्र सैनिक अधिकारी नामदेव चौधरी, भूषण संख्ये, आरोग्य निरीक्षक गाडे, पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले, सुरेखा जोशी, प्रिया राणे, उज्वला केतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयरे तलाव येथे स्वच्छता मोहीम राबविली.

हेही वाचा… दिवा-रत्नागिरी विशेष शटल सेवेला प्रवाशांची तुफान गर्दी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील जलस्त्रोत पर्यावरण संवर्धनात महत्वाची भूमिका बजावतात. हे जलस्त्रोत स्वच्छ राहिले पाहिजेत. जैवविविधता वाढविण्यास तलावांचे खूप महत्व आहे, अशी माहिती यावेळी पर्यावरण मंडळाच्या रुपाली शाईवाले यांनी विद्यार्थ्यांना दिली. मंडळाकडून निसर्ग संवर्धनासाठी दरवर्षी खाडी किनारी करण्यात येणाऱ्या खारफुटी लागवडीची माहिती त्यांनी यावेळी दिली.