लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: कल्याण डोंबिवली शहरे कचरामुक्त करण्यासाठी नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे. पालिकेच्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी हिरिरीने सहभागी व्हावे, असा गजर करत कल्याण डोंबिवली पालिकेचे स्वच्छता रथ कल्याण, डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झाले होते.

आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या उपस्थितीत हे चित्ररथ स्वागत यात्रेत सहभागी करण्यात आले. कचरा संकलन, ओला सुका कचरा, प्लास्टिक बंदी याबाबत जागृत करणारी संगीत धून चित्ररथावर वाजवून नागरिकांमध्ये जागृती केली जात होती.

आणखी वाचा- निरीक्षण गृहातील शिक्षिकेकडूनच अल्पवयीन मुलांचा लैंगिक छळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वच्छता रथाबरोबर गल्लीबोळात कचरा जमा करणाऱ्या घंटागाडीचा स्वागत यात्रेत सहभाग होता. ही वाहने नागरिकांची आकर्षण केंद्रे होती. स्वच्छता रथाबरोबर घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, साहाय्यक आयुक्त राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त भरत पाटील आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. स्वागत यात्रा मार्गावर पडलेला कचरा पर्यावरण दक्षता मंडळाच्या रुपाली शाईवाले, निर्मल युथ फाऊंडेशनच्या अक्षता आवटी, गगन शिंदे फाऊंडेशनच्या १०० कार्यकर्त्यांनी उचलून घंटागाडीत जमा केला.