डोंबिवली : पाकिस्तान विरूध्दचा चुरशीचा क्रिकेट सामना यापूर्वी भारताच्या क्रिकेट संघाने जिंकला की यापूर्वी रात्री बारा वाजल्यानंतर विजयोत्सवासाठी एक तास फटाक्यांचा धुमधडाका उडत होता. क्रिकेट प्रेमी नागरिक रस्त्यावर, इमारतीच्या गच्चीवर जाऊन रंगीबेरंगी, धुमधडाक्याचे फटाक्याचे वाजवित होते. दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ दुबई येथील रविवारच्या क्रिकेट सामान्यावर भारतीय क्रिकेट संंघाने बहिष्कार टाकावा. हा सामना नागरिकांनी बघू नये म्हणून राज्याच्या विविध भागात निदर्शने झाली.

बहुतांशी देशभक्त नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने हा सामना न पाहणे पसंत केले. त्यामुळे रविवारी रात्री भारताने पाकिस्तान विरूध्दचा सामना १३१ धावा आणि तीन गडी राखून जिंकला. पाकिस्तान क्रिकेट संघाने नऊ गडी गमावून १२७ धावा काढल्या होत्या. पहलगाम बैसरन टेकड्या येथे फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर एप्रिलमध्ये धर्म विचारून पर्यटकांच्या हत्या दहशतवाद्यांनी केल्या.

याविषयी देशभरात चीड आहे. ही चीड भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून नागरिकांनी व्यक्त केली. आम्ही हा सामना बघितला नसल्याचा संदेश पाकिस्तानला दिला. कल्याण, डोंबिवलीत यापूर्वी भारत पाकिस्तानमधील क्रिकेट सामना भारताने जिंकला की रात्रीची वेळ असुनही क्रिकेटप्रेमी नागरिक फटाक्यांची आताषबाजी करून आनंदोत्सव साजरा करत होते.

या सामन्याच्या विरूध्द रविवारी कल्याण डोंबिवली उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे यांनी एकत्रित आंदोलन केले होते. काही जागरूक नागरिकांनी या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे या आवाहनानुसार देशभक्त नागरिकांनी या सामन्याकडे पाठ फिरवली. काही नागरिकांनी घरात दरवाजे बंद करून उगाच कोणाला संशय येणार नाही, अशा पध्दतीने घरात रविवारचा भारत पाकिस्तानमधील क्रिकेट सामना पाहिला.

पण, भारत जिंकल्याचा आनंद जाहीरपणे साजरा केला तर उगाच परिरातील देशभक्त नागरिक, काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी भारत जिंकला असला तरी सर्वदूर हा सामना न पाहण्याचे आवाहन केले असताना आपण क्रिकेट सामना का पाहिला म्हणून आपल्या घराच्या दारात येण्याची शक्यता होती. आपणास जाब विचारण्याची शक्यता होती. त्यामुळे काही नागरिकांनी सामना पाहून, जिंकुनही घरात शांत राहणे पसंत केले. जिंकण्याच्या आनंदापेक्षा वेगळ्याच विषयाकडे हा विषय भरकटण्याची शक्यता होती. क्रिकेट सामना पाहून, विजयी झाल्याचा आनंद मनात असुनही काही नागरिकांनी आपल्या घरात शांतपणे भारत जिंकल्याचा मनातल्या मनात, घरातल्या घरात आनंद साजरा केला असल्याचे समजते.

भारत पाकिस्तान क्रिकेटच्या सामान्याच्या विरूध्द आंदोलन करणाऱ्या किती कार्यकर्त्यांनी रविवारी रात्रीचा सामना पाहिला नाही, अशी एक प्रश्नावरील एका जागरूक कार्यकर्त्याने केली होती. पण त्यावर कोणीही आपली मते व्यक्त केली नाहीत. त्यामुळे, हा सामना पाहो न पाहो आम्ही बहिष्कारात सहभागी झालो होतो, असाच संदेश नागरिकांनी पाकिस्तानला दिला असल्याचे समजते.