ठाणे – आर्ट ऑफ लिव्हिंगचे गुरूदेव श्री श्री रविशंकर यांच्या सानिध्यातील सोमनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगांंपैकी एक असलेले अद्भूत शिवलिंग येत्या बुधवारी (ता. २५) ठाण्यात आणले जाणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. भाविकांना या शिवलिंगाच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांनी सांगितले.
२५ जून रोजी संध्याकाळी साडे पाच वाजता आर माॅलमधील इलिफ रिटझ बॅन्क्वेट सभागृह, तिसरा माळा, घोडबंदर रस्ता, ठाणे पश्चिम येथे सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन आणि रुद्र पुजा आणि सत्संग पार पडणार आहे. ठाणे, कल्याण, मुंबई, डोंबिवली परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी या दर्शन सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आणि सर्वांसाठी खुला आहे.
या धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ९८२०९२८३८६ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हजार वर्षापूर्वी गझनीच्या महम्मदने सोमनाथ येथील शिवमंदिराचा विध्वंस केला होता. या मंदिरातील तोडमोड झालेल्या शिवलिंगाचे अग्निहोत्र ब्राह्मणांनी जतन केले. शंकराचार्यांच्या सल्ल्यावरून सोमनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांनी हे शिवलिंग आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्याकडे बंगलोर आश्रम येथे गेल्या वर्षी सुपूर्द केले, असे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. हेच शिवलिंग भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.