शिवसेनेतून बंडखोरी आणि राज्यातील सत्ता स्थापनेच्या गोंधळात परप्रांतात व्यग्र असताना मंत्री एकनाथ शिंदे यांना डोंबिवलीतील आपला निष्ठावान शिवसैनिक खूप आजारी असल्याची माहिती मिळाली. त्या धबडग्यात शिंदे यांनी वेळ काढून संबंधित शिवसैनिक उपचार घेत असलेल्या रुग्णालयात संपर्क केला. डॉक्टरांशी बोलून संबंधित शिवसैनिकावर योग्य वैद्यकीय उपचार करण्याची आणि त्यांना सुखरूप घरी सोडण्याची सूचना केली.

शिवसेनाप्रमुखांचा विचार घेऊन जगणारे, आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले डोंबिवलीतील निष्ठावान शिवसैनिक राम मिराशी खूप आजारी आहेत. त्यांच्यावर डोंबिवली एमआयडीसीतील डॉ. मिलिंद शिरोडकर यांच्या एम्स रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अशी माहिती आसाममधील गुवाहाटी येथे असलेल्या शिंदे यांना मिळाली होती.

राज्यातील सत्ता स्थापनेच्या कामात व्यग्र, सततच्या बैठका, नेते, मंत्र्यांचे फोन अशा धबडग्यात असतानाही एकनाथ शिंदे यांनी ही महत्वाची कामे बाजुला ठेवत डोंबिवलीत डॉ. शिरोडकर यांना संपर्क केला आणि त्यांना राम मिराशी यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना केल्या. राम या नावाने एकनाथ शिंदे या कार्यकर्त्याला ओळखतात. कट्टर शिंदे समर्थक म्हणून ते ओळखले जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिवंगत ॲड. शशिकांत ठोसर, अजित नाडकर्णी, सदानंद थरवळ, गोविंद चौधऱी, चंद्रकांत कुलकर्णी अशा अनेक निष्ठावान शिवसैनिकांपैकी राम मिराशी हे एक आहेत. ते आजारी असल्याने शिवसैनिकांची धावाधाव सुरू आहे.