डोंबिवली: काटई-बदलापूर रस्त्यावर रविवारी दुपारी तीन जणांनी एका वाहन चालकाला पलावा-खोणी भागात अडविले. आम्हाला वाशी येथे जायचे आहे असे सांगून त्याच्या वाहनात जबरदस्तीने बसले. वाहन चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्या जवळील रोख रक्कम काढून घेतली. चालकाला जबरदस्तीने वाहनातून ढकलून देऊन चोरटे वाहनासह फरार झाले.

सचीन शाव (२०) असे वाहन चालकाचे नाव आहे. चालकाने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी सांगितले, सचीन हे त्यांच्या मोटारीने काटई-बदलापूर रस्त्याने रविवारी दुपारच्या वेळेत चालले होते. पलावा-खोणी भागातून जात असताना सचीन यांना तीन जणांनी हात दाखवून थांबविले. आम्हाला वाशी येथे जायचे आहे, असे बोलून ते जबरदस्तीने वाहनात बसले.

हेही वाचा… दत्तक प्रक्रियेत ‘कन्यारत्नाला’ पसंती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी वाशी येथे जात नाही, असे सांगूनही त्यांनी जबरदस्तीने वाहनाचा ताबा घेतला. वाहनात बसल्यावर एकाने चाकूचा धाक चालक सचीनला दाखविला. जास्त आवाज केला तर तुला बघून घेऊ, अशी धमकी दिली. सचीन आपल्या मोटीराचा ताबा सोडण्यास तयार नसल्याने तिघा चोरट्यांनी सचीन यांना मोटारीत मारहाण केली. एकाने चोरट्याने सचीनला वाहनातून जबरदस्तीने उतरवून स्वता वाहनाचा ताबा घेतला. तिघे चोरेट सचीन जवळील दीड हजार रूपये रक्कम आणि त्याची मोटार असा एकूण २ लाखाहून अधिकचा ऐवज घेऊन पसार झाले. मानपाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.