अंमली पदार्थाने भरलेल्या सिरपच्या बाटल्या विक्रीसाठी आलेल्या दोन तस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या निजामपूरा पोलीसांच्या पथकला तस्करांनि चाकूचा धाक दाखविल्याचा प्रकार भिवंडीत उघडकीस आला. सदफ अन्सारी (२४) आणि शाहीर अन्सारी (२२) अशी त्यांची नावे असून पोलिसांनी अतिरिक्त फौज मागवून त्यांना ताब्यात घेऊन अटक केली.

हेही वाचा- दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून शेजारच्या महिलेची हत्या; डोंबिवलीतील पिसवली गावातील घटना

भिवंडी येथील संगमपाडा परिसरात सदफ आणि शाहीर हे दोघेही अंमली पदार्थ विक्री करत असल्याचे निजामपूरा पोलिसांना आढळून आले. पोलिसांचे पथक त्यांच्याजवळ गेले असता, त्यांनी पोलीस पथकाला चाकू दाखवून आरडा-ओरड करण्यास सुरूवात केली. त्यामुळे परिसरातील नागरिकही भयभीत झाले होते. अखेर पोलिसांनी अतिरिक्त फौज मागवून या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याविरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाख करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.