ठाणे : मुंबईत ठाकरे गटाच्या वर्धापनदिनानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात हिमंत असेल तर कम ऑन किल मी…’ हे विधान केले होते. यास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘कम ऑन…हेल्प मी’ हाक आल्यास धावून जाणारे पहिले एकनाथ शिंदे असतात, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. कोणतीही दुर्घटना घडल्यास, ते पहिले धावून जाणारे होते. आम्ही नेहमी वाचविण्याचाच विचार नेहमी करतो. चित्रपटातील संवाद अनेकजण वापरत आहेत, अशी टीका देखील श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर केली.

केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधात आपली भूमिका मांडण्यासाठी विविध देशांत आपली शिष्टमंडळे पाठवली. यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मिळाली होती. हा १४ दिवसांचा अनुभव ठाणेकर जनतेसोबत करण्यासाठी ‘डिप्लोमसी बाय डॉ. श्रीकांत शिंदे’ या मुलाखतीचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ पत्रकार मिलिंद भागवत यांनी श्रीकांत शिंदे यांच्याशी संवाद साधला.

मी महाविद्यालयात असताना खासदार झालो. माझ्यातील विद्यार्थी आज ही तसाच आहे. मला अभ्यास करायला आवडतो. मी आजही विविध बाबींचा अभ्यास करत असतो. भेट देणाऱ्या देशाचा अभ्यास केला. राष्ट्रप्रमुखांसोबत बसून देशाची बाजू मांडली असे शिंदे यांनी सांगितले. लायबेरिया येथील राष्ट्रप्रमुखांनी मला सिनेट मध्ये बोलण्याची संधी दिली अशी संधी मिळणे हे खूप अभिमानास्पद आहे असेही त्यांनी सांगितले. या शिष्टमंडळाच्या माध्यमातून पूर्ण जगामध्ये जाऊन पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवण्याची संधी आम्हाला मिळाली. पाकिस्तानचा बूरखा आम्हाला फाडयचा होता. ही संधी आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाली असेही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसच्या काही नेत्यांनी पक्ष बाजूला ठेवून प्रखरतेने भारताची भूमिका या दौऱ्यात मांडली. या नेत्यांकडून राहुल गांधींनी शिकावे. आपले खासदार जगात देशाची भूमिका मांडायला गेले. तेव्हा राहुल गांधी पाकिस्तानच्या फायद्याचे बोलत होते. असा टोला श्रीकांत शिंदे यांनी राहुल गांधी यांना लगावला. मुळात काही लोकांना याचा त्रास झाला की माझ्या पेक्षा नवीन खासदाराला पाठवल कसे? त्यांच्याकडून टीका होत होती. पण प्रत्येकाला त्यांच्या लायकीनुसार पाठवले जाते असा टोला शिंदे यांनी यावेळी लगावला.