ठाणे-पुणे महामार्गावरील शिळफाटा ते दहिसर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत गोदामामुळे या पट्ट्यामध्ये दररोज वाहतूक कोंडी होते. या गोदामासाठी या भागातील नाले, मोरया बुजवण्यात आले आहेत. प्रवासी आणि स्थानिक ग्रामस्थ यांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून येत्या महिनाभरात ही सर्व अतिक्रमणे हटवली जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांना सोमवारी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या रस्त्यावरील मोऱ्या, डोंगरातून येणारे नैसर्गिक नाले गोदामांच्या बांधकामासाठी बंद करण्यात आले आहेत. या बांधकामांमुळे पावसाळ्यात थोडा पाऊस पडला तरी दहिसर दरम्यानचे रस्ते पाण्याखाली जातात. पूर परिस्थिती असेल तेव्हा या भागात चार ते पाच फुट पाण्याची पातळी रस्त्यावर असते. रस्त्यावरील भंगारावर पडलेले पावसाचे पाणी, यंत्रसामग्री मधील रसायन आजूबाजूच्या शेती, माळरानावर वाहून जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भात पिक व इतर पिकांची नासाडी होत आहे, अशी तक्रार कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.

More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Encroachments on shilphata dahisar road to be removed within month said by thane district collector asj
First published on: 16-03-2022 at 15:42 IST