Exhibition of wooden paintings started Bal Bhavan Dombivli students ysh 95 | Loksatta

डोंबिवलीत बालभवनमध्ये लाकडी चित्रांच्या प्रदर्शनाला प्रारंभ

ज्येष्ठ ग्राफिक्स डिझायनर आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी अभिजीत चौबळ यांच्या हस्तकौशल्यातून तयार करण्यात आलेल्या लाकडी चित्रांचे प्रदर्शन शनिवारपासून डोंबिवली पूर्व मधील रामनगर भागातील पालिकेच्या आनंद बालभवन वास्तूत सुरू झाले आहे.

tv exbition
डोंबिवलीत बालभवनमध्ये लाकडी चित्रांच्या प्रदर्शनाला प्रारंभ

डोंबिवली- ज्येष्ठ ग्राफिक्स डिझायनर आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी अभिजीत चौबळ यांच्या हस्तकौशल्यातून तयार करण्यात आलेल्या लाकडी चित्रांचे प्रदर्शन शनिवारपासून डोंबिवली पूर्व मधील रामनगर भागातील पालिकेच्या आनंद बालभवन वास्तूत सुरू झाले आहे.

रविवारी सकाळी ११ ते रात्री ७.३० पर्यंत हे प्रदर्शन नागरिक, रसिकांना पाहणे आणि या प्रदर्शनातील लाकडी चित्र खरेदीसाठी खुले राहणार आहे. शनिवारी सकाळी डोंबिवलीतील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ४० हून अधिक लाकडी चित्रांच्या कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. चित्रकला आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून या कलाकृती लाकडावर तयार करण्यात आल्या आहेत. घर सजविण्यासाठी या चित्र कलाकृती साजेशा आहेत. पहिल्या दिवशी कल्याण, ठाणे, डोंबिवली परिसरातील नागरिकांनी चित्र प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला, असे संयोजक चौबळ यांनी सांगितले. पुण्यानंतर डोंबिवलीत आयोजित केलेले चौबळ यांचे हे दुसरे प्रदर्शन आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-10-2022 at 20:56 IST
Next Story
कल्याणच्या काळा तलावाला संरक्षित पुरातत्व दर्जा देण्यासाठी अहवाल सादर करण्याचे आदेश