मलेशियामध्ये नोकरी देतो असे सांगून दोन भामट्यांनी चार जणांची फसवणूक केल्याचा प्रकार मुंब्रा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी परवेझ शेख (६०) आणि मुदस्सीर शेख (३५) यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
फसवणूक झालेले तरुण मुंब्रा भागात राहतात. त्यांची ओळख परवेझ आणि मुदस्सीर यांच्यासोबत झाली होती. मलेशिया येथे नोकरीला लावतो असे सांगून त्यांनी त्यांच्याकडून मे ते जुलै या कालावधीत १ लाख ६० हजार रुपये घेतले होते. अनेक महिने उलटल्यानंतरही त्यांना कुठेही नोकरी देण्यात आली नव्हती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.