Cidco : नवी मुंबई – नवी मुंबई विकास आराखड्यातील (डेव्हलपमेंट प्लॅन -DP) अंतर्गत नवी मुंबई महापालिकेसाठी राखीव ठेवलेले भूखंड सिडकोने विकल्याच्या मुद्द्यावरून मागील अनेक महिन्यांपासून वादंग निर्माण झाले होते. अशातच भाजप नेते गणेश नाईक यांनी या मुद्द्यावरून पुन्हा एकदा प्रशासनावर थेट हल्लाबोल केला आहे. “महापालिकेसाठी आरक्षित जागा विकून टाकणारे आणि त्याला सीसी (Commencement Certificate) देणारे अधिकारी हे या शहराचे वैरी आहेत. ‘मास्टर व्हॉइस’ म्हणतो म्हणून सर्व काही योग्य नसते. त्याने चुकीच्या गोष्टी सांगितल्या असल्यास ते केल्या जाऊ नये असा थेट टोला नाईक यांनी लगावला.
नवी मुंबई शहराच्या विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लॅन -DP) तयार करण्यात आला होता. यात शहरातील मोकळ्या जमिनींवर पालिकेची विविध नागरी सुविधांची आरक्षणे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, या आरक्षणांमुळे शहरातील मोक्याच्या ठिकाणांवर असलेल्या भूखंडांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न बुडण्याची सिडकोला धास्ती असल्याने म्हटले जात होते. त्यामुळे यातील काही आरक्षणांना सिडकोकडून आक्षेपही घेण्यात आला होता. हा मुद्दा सर्वत्र चर्चेत असतानाच नाईक यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यांवरून प्रशासनावर टिका केल्याचे दिसून आले.
नाईक यांनी यावेळी प्रशासनाला ठणकावून सांगितले की, “महापालिकेसाठी आरक्षित जागा विकून टाकणारे आणि त्याला सीसी (Commencement Certificate) देणारे अधिकारी हे या शहराचे वैरी आहेत. ‘मास्टर व्हॉइस’ म्हणतो म्हणून सर्व काही योग्य नसते. या प्रकरणाचा संपूर्ण लेखाजोखा ते लवकरच मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहेत. जे नालायक अधिकारी शहराशी गद्दारी करत आहेत, त्यांना आम्ही आडवे करून पुढे जाणार आहोत,” असा संतप्त इशारा देखील त्यांनी दिला.
नाईक काय म्हणाल ?
एका कार्यक्रमा दरम्यान नाईक यांनी नवी मुंबई विकास आराखड्यात (डेव्हलपमेंट प्लॅन -DP) मध्ये जे भूखंड महापालिकेकरता देण्यात आले होते ते भूखंड सिडकोने विकले. या कामास सीसी (Commencement Certificate) देण्याचे काम करणारा अधिकारी हा या शहराचा वैरी आहे. ‘ही ईज मास्टर व्हॉइस, बॉस इज ऑलवेज राईट’ असे म्हणत त्यांनी बॉसने चुकीच्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टी करायच्या नसतात, असे खडसावून सांगितले. तसेच सर्व प्रभाग रचनेचा लेखाजोखा मुख्यमंत्र्यांकडे नाईक मांडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, जे नालायक अधिकारी आहेत ते आम्हाला नको. हे देखील ते सांगणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचप्रमाणे आमच्या आडवे येतील त्यांना आम्ही आडवे करून पुढे जाऊ असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.