भाईंदर : लिव्ह ईन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलांची पिळवणूक होत असल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनेतून स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे मुलींनी या भानगडीत न पडता आई-वडिलांच्या संमतीने रीतसर लग्न करावे, असे आवाहन भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले आहे. सरस्वती वैद्य हत्या प्रकरणी शनिवारी वाघ यांनी मिरा रोडला भेट देऊन पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांच्याशी चर्चा केली. श्रद्धा वालकर प्रकरण आणि आता सरस्वती वैद्यचे प्रकरण समोर आल्यामुळे लिव्ह ईन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलांचीच पिळवणूक होत असल्याचे स्पष्ट होत आहे. या संबंधामुळे महिला कुटुंबापासून दुरावते आणि तिचा कुठलाच थांगपत्ता तिचा कुटुंबीयांना नसतो. त्यामुळे मुलींनी लिव्ह ईनमध्ये राहण्याऐवजी वडिलांच्या पसंतीनेच रीतसर लग्न करावे, असे चित्रा वाघ म्हणाल्या. हेही वाचा - भिवंडीत थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी दोन हजारांच्या नोटा जमा करा, थकीत मालमत्ता करवसुलीसाठी प्रशासनाची नवी शक्कल मनोज साने याने केलेले कृत्य हे अत्यंत क्रूर असून अशा अघोरी व्यक्तीला फाशीचीच शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न करणार असल्याचेदेखील चित्रा वाघ यांनी सांगितले.