केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मदतीचे आश्वासन

मध्य रेल्वे आणि परिवहन उपक्रमांवर प्रवाशांचा वाढलेला भार कमी व्हावा तसेच शहरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी या सर्वच शहरांना जोडणारा ठाणे-कल्याण-मुंबई असा जलवाहतुकीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी राजकीय तसेच प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पाचा महापालिका प्रशासनाने दोन टप्प्यांत अहवाल तयार केला असून त्याचे गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादरीकरण करण्यात आले.

cancer, Nagpur, cobalt devices,
नागपुरात कर्करुग्णांचे हाल थांबणार कधी? कालबाह्य कोबाल्ट यंत्रावरच…
Why mango prices increased in Nagpur what are the reasons
आंब्याच्या किंमती नागपुरात कां वाढल्या, ही आहेत कारणे
Navneet Ranas campaign office destroyed due to gusty winds
वादळवारं सुटलं गो… सोसाट्याच्‍या वाऱ्यामुळे नवनीत राणा यांचे प्रचार कार्यालय जमीनदोस्त
Unseasonal weathe hail in Vidarbha Three districts of Marathwada are also affected by rain
विदर्भात अवकाळी, गारपीट; मराठवाडय़ाच्या तीन जिल्ह्यांनाही पावसाचा तडाखा

या सादरीकरणानंतर गडकरी यांनी महापालिकेला त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्याने या प्रकल्पाला गती मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, ठाणे शहरातील तीन हात नाका भागात राबविण्यात येणाऱ्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे या वेळी सादरीकरण करण्यात आले असून या प्रकल्पालाही लवकरच चालना मिळणार आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहराचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले आहे. मध्य रेल्वेच्या माध्यमातून ही शहरे मुंबई शहराला जोडण्यात आली आहेत. या शहरांमधून दररोज मुंबईला कामासाठी जाणाऱ्या नागरिकांचा आकडा मोठा आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर प्रवाशांचा भार वाढला आहे. त्याचबरोबर ठाणे तसेच कल्याण या शहरातील महापालिकेमार्फत परिवहन उपक्रम चालविण्यात येत असून या उपक्रमावरही प्रवाशांचा भार वाढला आहे. तसेच शहरातील वाहनांच्या संख्येत वाढ होत असून त्या तुलनेत रस्ते मात्र अपुरे पडू लागले आहेत. अनेक रस्त्यांच्या रुंदीकरणासही फारसा वाव राहिलेला नाही. त्यामुळे शहरातील मुख्य जंक्शन तसेच चौकांमध्ये वाहतूक कोंडी होत असून या कोंडीमुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत.  मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली या शहरांना मोठा खाडीकिनारा लाभला असून या खाडीमध्ये जलवाहतूक सुरू करण्याचा विचार गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे. जलवाहतूक व्यवस्थेमुळे शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा नवा पर्याय खुला उपलब्ध होणार आहे. तसेच रेल्वे तसेच परिवहन उपक्रमांवरील भार कमी होणार आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हा प्रकल्प राबविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या प्रकल्पाचा दोन टप्प्यांत अहवाल तयार केला असून त्यांनी गुरुवारी या अहवालाचे सादरीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे  केले. त्या वेळी खासदार राजन विचारे, खासदार श्रीकांत शिंदे, ठाण्याचे महापौर संजय मोरे उपस्थित होते.

प्रकल्पांचे कौतुक

देशभरातील १०१ राष्ट्रीय जलमार्ग विकसित करण्याचा कायदा संसदेत मंजूर करण्यात आला. त्यातही ठाण्याच्या जलमार्गाचा समावेश करण्यात आला होता. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात गडकरी यांच्याकडे एक बैठक झाली होती. या बैठकीत स्थानिक महापालिकांनी पुढाकार घेऊन याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गडकरींनी दिले होते. त्यानुसार, ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुढाकार घेऊन दोन टप्प्यांत प्रकल्प अहवाल तयार केला.