ठाणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून यंदाही ठाणे जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारल्याचे दिसत आहे. ठाणे जिल्ह्यात ९५.५७ टक्के दहावीचा निकाल लागला आहे. तर, ९६.६९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातील विविध भागांतून यंदाच्या वर्षी १ लाख १३ हजार ३२८ विद्यार्थांनी दहावीची परिक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ०८ हजार ३११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
बारावी पाठोपाठ मंगळवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर केला आहे. ठाणे जिल्ह्याचा यंदाच्या वर्षी ९५.५७ टक्के निकाल लागला असून जिल्ह्यात यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे दिसत आहे. ठाणे जिल्ह्यातून यंदाच्या वर्षी १ लाख १३ हजार ३२८ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. त्यापैकी १ लाख ०८ हजार ३११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ५४ हजार ८७३ मुलांचा आणि ५३ हजार ४३८ मुलींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात यंदाही मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून ९६. ६९ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, ९४. ५० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९५.५६ टक्के लागला होता. तर, यंदाच्या वर्षी ९५.५७ टक्के निकाल लागला आहे, अशी माहिती जिल्हा माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली.
मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्राचा सर्वाधिक निकाल
मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्राचा दहावीचा निकाल ९७.७६ टक्के लागला आहे. मिराभाईंदर शहारातून १० हजार ५७० विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. यापैकी १० हजार ३३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ५ हजार २८५ मुलांचा तर, ५ हजार ४९ मुलींचा समावेश आहे.
शहर – तालुका निहाय्य निकाल (टक्केवारीनुसार)
शहर – उत्तीर्ण मुले – उत्तीर्ण मुली – एकूण
ठाणे – ९४.७५ – ९६.६० – ९५.६६
कल्याण-डोंबिवली – ९५.४७ – ९७.२४ – ९६.३३
भिवंडी पालिका – ८९.८१ – ९५.४८ – ९२.७९
उल्हासनगर – ९१.७२ – ९३.५२ – ९२.६०
नवी मुंबई – ९६.६१ – ९८.०९ – ९७.३२
मिरा-भाईंदर – ९७.३८ – ९८.१७ – ९७.७६
(तालुकानिहाय्य)
कल्याण – ९१.६१ – ९५.५३ – ९३.४५
अंबरनाथ – ९५.६६ – ९६.२४ – ९५.९३
भिवंडी – ८९.५७ – ९५.३६ – ९२.३५
मुरबाड – ९१.४९ – ९४.९२ – ९३.१३
शहापूर – ९५.७७ – ९७.८३ – ९६.७५
एकूण – ९४.५० – ९६.६९ – ९५.५७