शमीम अकबर अली या अभिनेत्रीला मीरा रोड या ठिकाणी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी अभिनेत्रीने काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिच्या मुलीच्या शाळेजवळ एका ऑटो चालकाने तिच्यावर हल्ला केला तिला मारहाण केली असं या अभिनेत्रीने तक्रारीत म्हटलं आहे. शनिवारी दुपारच्या वेळी ही घटना घडली. माझ्या मुलीच्या समोरच माझा हात रिक्षावाल्याने पिरगळला आणि मला मारहाण केली असा आरोप अभिनेत्रीने केला आहे.
पोलिसांना अभिनेत्री शमिमने काय सांगितलं?
पोलिसांना अभिनेत्री शमीमने सांगितलं की कनाकिया जिममधून वर्क आऊट संपवून तिने ऑटो रिक्षा बोलवली. दुपारी २.४५ च्या सुमारास तिने मुलीच्या शाळेजवळ रिक्षा थांबवली. मात्र याचाच रिक्षावाल्याला राग आला. तो तिच्यावर खेकसला आणि ओरडू लागला. रिक्षा चालकाने मला इथे रिक्षा का थांबवायला लावली म्हणत शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसंच मी घाईत आहे मला रिक्षाचे पैसे तातडीने द्या असंही तो म्हणू लागला. मी मुलीच्या शाळेजवळ होते मी पटकन माझ्या मुलीला बरोबर घेतलं त्या रिक्षावाल्याला आम्हाला घरी सोड तुला पैसे देते असं सांगितलं.
मी माझ्या मुलीला जेव्हा ते वाक्य म्हटलं तेव्हा रिक्षावाला खूप चिडला
शमीम तक्रारीत पुढे म्हणाली की रिक्षावाल्याने आम्हाला सोसायटीच्या आणलं. माझी मुलगी म्हणाली आई फाऊंटन जवळ चल. त्यानंतर मी माझ्या मुलीला सांगितलं की आपण दुसऱ्या रिक्षाने जाऊ. हे ऐकल्यानंतर तो रिक्षा चालक एकदम आक्रमक झाला. त्याने माझ्या मुलीसमोरच माझा हात धरला आणि पिरगळला. त्यानंतर मला त्याने माझ्या मुलीसमोरच मारहाण केली.
पोलिसांकडून रिक्षा चालकाचा शोध सुरु
शनिवारच्या या घटनेनंतर शमीमने काशिमीरा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे तसंच रिक्षाचा क्रमांकही नोंदवून घेतला आहे. पोलीस आता या नंबरच्या आधारे रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत. Free Press Journal ने हे वृत्त दिलं आहे.
