scorecardresearch

कल्याण, डोंबिवलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

डोंबिवली, कल्याण परिसरात शनिवारी दुपारी विजांचा गडगडाट मुसळधार पाऊस पडला. ऐन नवरात्रोत्सवात पडलेल्या जोरधारांमुळे भाविकांची गैरसोय झाली.

कल्याण, डोंबिवलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
कल्याण, डोंबिवलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

कल्याण : डोंबिवली, कल्याण परिसरात शनिवारी दुपारी विजांचा गडगडाट मुसळधार पाऊस पडला. ऐन नवरात्रोत्सवात पडलेल्या जोरधारांमुळे भाविकांची गैरसोय झाली. उत्सवी वातावरणामुळे कल्याण आणि डोंबिवलीतील बाजारपेठा दररोज गर्दीने गजबजतात. शनिवारी सकाळी आकाश निरभ्र होते. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. भाविकही मोठय़ा संख्येने दर्शनासाठी बाहेर पडले होते. मात्र अचानक मुसळधार पाऊस पडू लागल्याने त्यांची त्रेधातिरपीट उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी आलेल्या भाविकांमुळे गावदेवी, कुलदैवत मंदिरांजवळ उभारलेले मंडप अपुरे पडले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या